संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नगर परिषद राजुरा येथील नागरीकाना चतुर्थ वार्षिक फेर कर मूल्यांकन विशेष नोटिस प्राप्त झालेल्या असून राजुरा हद्दीतील सर्व करपात्र मालमत्तांचे पुनरमूल्यांकन करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे. मुख्याधिकारी नगरपरिषद राजुरा यांनी शहरातील मालमत्तांनवर (निवासी/ बिगर निवासी/ व खुले भूखंड) कर योग्य मूल्यांवर आधारित करपात्र क्षेत्रफळासाठी प्रारूप कर निर्धारण यादी तयार करतांना राजुरा शहरातील Global Poshitioning System (GPS) द्वारे सर्वे करतांना योग्य पद्धतीने सर्वेक्षन झाले नसल्याने राजुरा शहरातील अनेक गोरगरिबांना वाढीव कर आकारणीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे शहरातील नगरिकामध्ये सरकारच्या धोरणविषयी मोठा असंतोष निर्माण झालेला आहे.
राजुरा शहरात सन २०१२ पासून सर्वे करून कर आकारणी झालेली नाही. यापूर्वी राजुरा नगरपरिषदेकडून कर आकारणी मध्ये फक्त १० टक्के कर वाढ दर ४ वर्षांनी केली जात होती, मात्र सध्या परिस्थितीत (GPS) द्वारे सर्वे करून मोठ्या प्रमाणात करात वाढ केली आहे, त्यामुळे राजुरा शहरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे मोठ्या प्रमाणात झालेली करवाढ भरण्यास नागरिक असमर्थ असल्याने सदरहू कर आकारणी रद्द करण्याची मागणी राजुरा काँग्रेसच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा राजुरा शहरातील नागरिकांच्या वतीने मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला. मुख्याधिकारी यांच्या वतीने निवेदन मुख्य लिपिक संदीप वानखेडे यांनी स्विकारले. त्यांच्या माध्यमातून हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, संध्या चांदेकर, रवी त्रिशूलवार, जिल्हा महासचिव एजाज अहमद, सुमित्राबाई कुचनकर, पुनम गिरसावळे, दिलीप सदावर्ते, पंढरी देरकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, मतीन कुरेशी, किशोर बानकर, भाऊजी लांडे, रतन पचारे, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, संघपाल देठे, मारोती वांढरे, राजु गौरशेट्टीवार, सतीश नक्षणे, प्रकाश आक्केवार, सुरेश सोमलकर, हणुमंत सुर्यवंशी, राजु बेजंकीवार, मंगला पंदिलवार, बबन वाघमारे यासह काँग्रेसच्या फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजुरा शहरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…