अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- पासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आजनी गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या खुशी रवीशेखर चवारे, या 19 वर्षे मुलीने मीस महाराष्ट्राचा किताब जिंकून सावनेर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक केले आहे. खुशीचे वडील रवीशेखर हे शेतकरी असून आई या स्वतःचे बुटीक चालवितात.
लहानपणी पासूनच खुशीला मॉडलिंगची फार मोठ्या प्रमाणात आवड होती तिच्या या आवडीला लक्षात घेत आई-वडिलांनी तिला या क्षेत्रात जाण्याची संधी दिली. याच संधीचे सोने साधून खुशीने या स्पर्धेत भाग घेऊन मिस महाराष्ट्राचा मान मुंबई येथे आयोजित स्पर्धेत पटकाविला.
दि.1 सप्टेंबर 2024 ला मुंबई येथील मुकेश पटेल ऑडिटोरियम येथे ही स्पर्धा सलग तीनदा मिस युनिव्हर्स राहिलेल्या झोया सिराज शेख यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला स्पर्धेला चित्रपट सृष्टीतील अभिनेत्या नेहा धुपिया व उत्कृष्ट कोरिओग्राफर टेरेस लेविस यांच्या हस्ते खुशीला हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी 2023 मध्ये मिस गॅलेक्सी राहिलेल्या चाहत दलाल व मराठी अभिनेत्या सोनाली नाईक यावेळी उपस्थित होत्या.
सावनेरचा विघ्नहर्ता मंडळ, व्यापारी संघ व भवन पेरेंट्स ग्रुप तर्फे खुशीचा सत्कार.
सावनेरच्या खुशीने हा मान पटकाविल्यामुळे खुशीचे व तिच्या आई-वडिलांचे सावनेरच्या विघ्नहर्ता मंडळ, व्यापारी संघ सावनेर व भवन पेरेंट्स ग्रुप कोराडी यांच्या तर्फे खुशीचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सावनेरचा विघ्नहर्ता मंडळाचे प्रमुख तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अतुल पाटील, माजी अध्यक्ष विनोद जैन, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राहुल बारई, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, के. डी.पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. योगेश पाटील, डॉ. आशिष चांडक, डॉ.अमित बाहेती तसेच विजय पांडे,सोनू देशमुख,निलेश घटे,किशोर अंतुरकर, सोनभद्रे,पप्पू पोपली यावेळी उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…