राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिंपरी:- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध वक्ते प्रा. विठ्ठल कांगणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम राजुरा शहरात शेतकरी संघटना युवा आघाडीने आयोजित केला होता. ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात हजारो युवकांनी उपस्थिती दर्शवली. संपूर्ण सभागृह भरगच्च भरलेले होते. जागा अपुरी पडू लागली म्हणून काहींना स्टेजवर बसविले आणि अवतिभवती उभे राहावे लागले. विशेष म्हणजे कॉलेजवयीन मुलांसोबत मुलींची संख्या मोठी होती. या कार्यक्रमात करिअरविषयक मार्गदर्शन करताना विविध स्पर्धा परीक्षा संधींची माहिती कांगणे गुरुजी यांनी दिली. यावेळी बोलताना युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी चटप साहेबांना विधानसभेत पाठवा असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी रिल स्टार आशिष बोबडे व विलास झट्टे यांनी विनोदी शैलीतून प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. युवा मनोगत शेवनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप यांनी मांडले. प्रास्ताविक युवा आघाडीचे कपिल इद्दे यांनी केले तर आभार ॲड. श्रीनिवास मुसळे यांनी मानले.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…