राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- येथील पनवेल येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आपल्याच जन्मदात्या आईची मुलीने सुपारी देऊन हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलगी आणि तिचा मानलेल्या भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रिया नाईक असे हत्या करण्यात आलेला आईचे नाव आहे. तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे असे हत्या करणाऱ्या आरोपीची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार आरोपी प्रणिता पाटील हीचे लग्न झालेले होते. परंतु तिचे पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती आपल्या आई कडे पनवेल येथे आली होती. मागील दोन वर्षांपासून ती तिच्या 5 वर्षांच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती. या वेळी तिचे एका युवकबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. परंतु तिच्याशी तिचे जमले नाही. तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती. तिच्या मोबाईलची तपासणी करत होती. त्यामुळे प्रणिता हीने आपल्या आईची हत्या करून तिच्या पासून मुक्ती मिळवण्याचा निर्णय घेतला.
मानलेल्या भावाला दिली आईच्या हत्येची सुपारी: आरोपी प्रणिता पाटील हिने विवेक पाटील याला भाऊ मानले होते. विवेक पाटील याला पैशांची गरज होती. तो प्रणिताकडे पैसे मागत होता. मग प्रणिताने तू आईला संपवल्यावर 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. विवेक त्यासाठी तयार झाला. मग विवेक पाटील याने निशांत पांडे याच्या मदतीने 13 सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली. रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली. त्यांनी तिला त्वरीत रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
प्रिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले. त्यावेळी त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केली. पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली. त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे समोर आले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…