गडचिरोली /प्रतिनिधी
गडचिरोली विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठाकडून कॅरी फॉरवर्ड योजना लागू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे. सविस्तर असे की गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कॅरी फॉरवर्ड सुविधा सत्र २०२३-२४ मध्ये देण्यात आली होती.मात्र चालू वर्षीही अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने आणि तसेच विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्डची गरज असल्याने सत्र २०२४-२५ मध्येही ही योजना सुरु व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्या तनुश्री ताई धर्मराव बाबा आत्राम यांना विंनती केली होती. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता तनुश्रीताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची तात्काळ भेट घेतली.विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॅरी फॉरवर्ड ही योजना यावर्षी सुद्धा लागू झाली पाहिजे अशी मागणी केली. यावर कुलगुरूंनी सुद्धा कॅरी फॉरवर्ड लागू करण्याचे आश्वासन दिले.आणि 5 सप्टेंबर रोजी गोंडवाना विद्यापीठ येथे सभेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड देण्याचे प्रस्ताव प्रारित करण्यात आले. 6 सप्टेंबर रोजी पासून 13 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी वेळ देण्यात आली. सदर निर्णयामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फायदा झाला असल्याने विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांचे आभार मानले आहे.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

23 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

23 hours ago