मथुरानगर(बाजारवाडी) येथे श्रीमद रामकथा कीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.

मूलचेरा:-तालुक्यातील बंगाली बहुल भागात दरवर्षी विविध कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.मोठ्या श्रद्धा व भक्तीने तेथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन कीर्तनाचा आनंद घेत असताना.
गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मथुरानगर(बाजारवाडी) येथे गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर स्थानिक गणेश मंदिर पटांगणात अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या तर्फे प्रसिद्ध कथा वाचक ‘पूज्य देवी संगीता किशोरी जी’ यांच्या श्रीमद रामकथा कीर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज होते. त्यावेळी गणेश मंडळ कमिटीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
राजे साहेबांनी श्रीमद रामकथा कीर्तन कार्यक्रमात उपस्थित सर्व गणेश भक्तजनांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.श्रीमद रामकथा कीर्तनाचा आनंद घेतला आणि गावकऱ्यांच्या आग्रहाने महाप्रसादाचा आस्वाद घेत आनंद द्विगुणीत केला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,भाजपचे तालुका अध्यक्ष संजीव सरकार,जिल्हा सचिव बादल शाह,महामंत्री विजय बिश्वास,शुभम कुत्तरमारे,अशोक बडाल,विजय मित्र,अनादी हवलदार,धनंजय बिश्वास,तापोष सरकार आणि मथुरानगर,गोविंदपूर,हरिनगर,गोमनी येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी अमित शहाचा सांगली मध्ये निदर्शने करून कऱण्यात आला निषेध.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

24 hours ago

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा राजुऱ्यात काँग्रेसकडून निषेध.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

1 day ago