अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय, हिंगणघाट येथे गृह अर्थशास्त्र विभागांतर्गत मोदक मेकिंग स्पर्धा व मूर्ती मेकिंग वर्कशॉप घेण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर, प्रमुख अतिथी डॉ. नयना शीरभाते उपप्राचार्य विद्या विकास कॉलेज, समुद्रपूर , उपप्राचार्य डॉ.सपना जयस्वाल, परिक्षक म्हणून शिक्षिका प्रियंका मानकर विद्या विकास विद्यालय हिंगणघाट, मूर्ती मेकिंग वर्कशॉप करिता मिलिंद सावरकर भारत विद्यालय हिंगणघाट तसेच विद्या विकास विद्यालय हिंगणघाटचे प्राचार्य नितेश रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रा. घाटे यांनी प्रास्ताविकातून सदर कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांच्या सूप्त कलांना वाव देणे व त्यांना आत्मनिर्भर करणे असल्याचे मत व्यक्त केले. चित्रकला अध्यापक सावरकर सरांनी विद्यार्थ्यांना मातीतून मूर्ती कशी साकारायची याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले. व त्यांच्याकडून अत्यंत सुंदर श्री गणेश मूर्ती बनवून घेतल्या. कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य तुळसकर यांनी ‘जीवनात एक तरी कला अवगत असावी माणसाला तरच तो मानव शोभला नाहीतर, कल्ला जीवनाचा या राष्ट्रसंतांच्या उक्तीचा परामर्श देत अंगी असलेली कला जीवनाला पूरक व प्रेरक कशी ठरेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. यावेळी डॉ.नयना शिरभाते यांनी कला साकारतांना पर्यावरणाचे भान कसे राखावे याबद्दल मार्गदर्शन केले. मोदक मेकींग स्पर्धेकरिता मुलींनी उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, पुरणाचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक तयार करून आणले होते. त्यांचे परीक्षण मानकर मॅडम यांनी केले. याशिवाय कलेचे मानवी जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून विशद केले.
या मोदक मेकिंग मध्ये कु. वैदेही विटाळे ला प्रथम, मयुरी मिलमीले ला द्वितीय तर नीलिमा माथनकर हिला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. क्ले मेकिंग मध्ये चेतना मेश्राम, लक्ष्मी वाकडे, लक्ष्मी दाते, यांच्या शाहीद शेख यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्रिया उरकुडकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार निर्झरा येळणे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वर्ग तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग सर्वांनी सहकार्य केले.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…