अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- निसर्गसाथी फाउंडेशनच्या वतीने तहसील कार्यालय हिंगणघाट येथे असलेल्या पाणपक्षी ची घरटी गणना करण्यात आली. या घरटी गणने मध्ये पानपक्षांच्या वेगवेगळ्या प्रजातींची 116 घरटी मोजण्यात आलेली आहे.
हिंगणघाट येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, जि.प. उपअभियंता कार्यालय या परिसरामध्ये मागील शंभर वर्षांपासून पानपक्षांची मिश्र विन वसाहत दरवर्षी येथे बसत असते. यामध्ये प्रामुख्याने चार प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी पाहायला मिळते दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला येथे घरटी तयार व्हायला लागतात व ऑक्टोबर महिन्यापर्यंत या पक्षांचे प्रजनन पूर्ण होऊन ही वसाहत तिथून निघून जाते.
यावर्षीच्या घरटी गणनेमध्ये दरवर्षी सामान्यपणे आढळणाऱ्या चार प्रजातींच्या व्यतिरिक्त पाचव्या प्रजातीचा पानपक्षाची घरटी यावर्षी आढळून आलेली आहे. म्हणजे घरटी करणाऱ्या प्रजातीं मध्ये वाढ झालेली आहे. यावर्षी घरटी प्रगतीमध्ये एकूण सर्व प्रजाती मिळून 116 घरटी मोजण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सर्वाधिक घरटी गायबगळा या प्रजातीची होती दुसऱ्या क्रमांकावर रात बगळ्याची 26 घरटी आढळून आली. छोटा बगळा या प्रजातीची 17 तर छोटा पानकावळा या प्रजातीची 11 घरटी आढळून आली. पहिल्यांदाच या गनने मध्ये भारतीय पानकावळा या प्रजातीची चार घरटी आढळून आली आहे. एकूण 32 झाडांवर ही घरटी असून खोटा अशोक, देशी बाबूळ, कडूनिंब, आंबा, करंजी, शिशु, केशिया सेमिया या झाडांवर ही घरटी आहे.
हेरोनरीला मराठीमध्ये सारंगागार म्हणतात हे पानपक्षी प्रजननासाठी समूहाने मानवी वस्तीमध्ये वसाहत करून हे पक्षी घरटी करतात. सारंगागार मधील प्रजनन अधिक प्रमाणामध्ये यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी कवट, चिंच, देशी बाभूळ या झाडांची लागवड होणे गरजेचे आहे ही झाडे या घरट्यांना अधिक सुरक्षा प्रदान करीत असते. निसर्गसाथी फाउंडेशन तर्फे तहसील कार्यालय पंचायत समिती परिसरामध्ये ही झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घरटी गणनेच्या या कार्यक्रमात गणना अधिकारी म्हणून पक्षीमित्र विदर्भ समन्वयक राहुल वकारे, बोर फाउंडेशनचे सचिव अशोक भानसे, कोषाध्यक्ष पवन दरणे, ज्ञानचंद गलवाणी, अमोल मुनेश्वर इत्यादी सहभागी झाले होते. यावेळी निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण कडू, चैतन्य वावधने, यशवंत शिवनकर, निजाजुद्दीन सिद्दीकी, बालाजी राजूरकर, प्रभाकर कोळसे, यशवंत गडवार, कु.अंजोर कडू, केवलचंद सिंघवी, अजय मोहाड सहभागी झाले होते. घरटी गणनेची माहिती घेण्यासाठी तहसीलदार योगेश्वर शिंदे, नायब तहसीलदार सागर कांबळे गणने दरम्यान भेट देऊन त्यांनी माहिती जाणून घेतली.
तेव्हाच बोनोलीचा गरुड हा शिकारी पक्षी अचानक झाडावर येऊन बसल्यामुळे सर्व पानपक्षांमध्ये दहशतीमुळे हालचाल आणि कल्ला सुरू झाला होता. निसर्गातील या हालचाली सर्व प्रगणकांना साक्षात डोळ्यांनी पाहता आल्या. या हेरॉनरी घरटी प्रगणनेचा अहवाल निसर्गसाथी तर्फे वर्धा वनविभाग, नगर पालिका हिंगणघाट, उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना सादर करण्यात येईल अशी माहिती प्रविण कडू यांनी दिली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…