मुंबई टागोर नगरमधील पुलाची जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न.

आसिफ शेख, मुंबई प्रतिनिधी.

मुंबई:- विक्रोळी कन्नमवार नगर आणि टागोर नगर याला जोडणारा म्हाडाचा पादचारी पूल टागोर नगर येथील क्रमांक ४४ आणि ४५ यांच्यामध्ये तर कन्नमवार नगरमध्ये श्रुषशा रुग्णालयासमोरील इमारतीच्या जागेमध्ये तयार करण्यात आला होता. काही वर्षापूर्वी हा पूल अतिधोकादायक झाल्यामुळे तोडण्यात आला, मात्र यासाठी असणाऱ्या जागेत म्हाडाने कोणतेही कुंपण न घातल्याने ही जागा विकासक गिळंकृत करत आहेत.

कन्नमवार नगर आणि टागोर नगरमध्ये पूर्व द्रुतगती मार्ग असल्यामुळे दोन्ही विभागांना जोडण्यासाठी म्हाडाने तीन पादचारी पूल या भागात तयार केले होते. त्यापैकी टागोर नगरमधील बाजाराला थेट जोडला गेलेला हा पादचारी पूल सर्वात सोयीस्कर होता. रवींद्र नगर उद्यान (हत्ती गार्डन) समोरील हा पूल धोकादायक झाल्यामुळे जमीनदोस्त करण्यात आला. जमीनदोस्त केलेल्या पादचारी पुलाची टागोर नगरमधील जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे कन्नमवार नगरकडे असणाऱ्या पुलाची जागा आज देखील आरक्षित करण्यात आलेली आहे. भविष्यात विक्रोळीमध्ये होणाऱ्या पुनर्विकासाचा वेग पाहता लोकसंख्या वाढणार आहे व या पादचारी पुलांची गरज भासणार आहे. यामुळे म्हाडाने या ठिकाणी कुंपण घालून ही जागा पादचारी पुलासाठी आरक्षित करावी अशी मागणी विक्रोळीकरांकडून होऊ लागली आहे. २०२० मध्ये या पुलासाठी जेंटल रिमाइंडर या सामाजिक ग्रुपकडून सोशल मीडियामार्फत कॅम्पेन देखील चालवण्यात आले होते. मात्र याकडे देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

गेल्या तीन ते चार वर्षापासून या जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी महापालिका तसेच आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणाही हा विषय गंभीरपणे घ्यायला तयार नाही आहे. हे प्रकरण आमचे नाही हे प्रकरण दुसरा विभागाचे आहे असे सांगून माझी तक्रार डावलत आहेत. म्हाडा प्राधिकरणाकडे देखील मी तक्रार केली आहे जर विकासकाने या जागेवर काम सुरू केले तर पुढे काही करता येणार नाही. यामुळे म्हाडाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे असे समाजसेवक ऍड रितेश करकेरा यांनी सांगितले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

12 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

12 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

13 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

13 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

13 hours ago