मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेक तरुणाचा बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या बातम्या वेळोवेळी समोर येत असतात. त्यामुळे गडचिरोली जिल्हात आरोग्य व्यवस्थेचे धिंडोळे निघत असताना भामरागड तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
भामरागड तालुक्यात 17 सप्टेंबरला एका डॉक्टरला शासकीय रुग्णवाहिकेतून चक्क दारूची वाहतूक करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामुळे आरोग्य वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. ब्रम्हानंद रैनू पुंगाटी वय 29 वर्ष राह. बारसेवाडा ता. एटापल्ली असे त्या डॉक्टरचे नाव आहे. नक्षल प्रभावित व आदिवासी बहुल पिपली बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात तो कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
15 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हालेवारा पोलिस मवेली – हालेवारा – पिपली बुर्गी या मार्गावर नाकाबंदी करत होते. यावेळी (MH 33 T 4478) ही तेथून जात होती. रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण चालकाने गाडी सुसाट नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी पाठलाग करत रुग्णवाहिका थांबवून तपासणी केली असता आत देशी दारूचे 10 बॉक्स व विदेशी दारूच्या 96 बाटल्या आढलून आल्या.
रुग्णवाहिकेत मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा मिळून आल्याने पोलिसांनी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी वय 29 वर्ष राह. बारसेवाडा, शशिकांत बिरजा मडावी वय 33 राह. एटापल्ली, सौरभ गजानन लेखामी वय 20 वर्ष राह. पिपली बुर्गी, भिवाजी रैनू पदा वय 31 वर्ष राह. पिपली बुर्गी यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेत दिलीप लालू लेखामी राह. पिपली बुर्गी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. याचा शोध पोलीस घेत आहे. याप्रकरणी हालेवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी – विदेशी 88 हजार 60 रुपयांची दारू व रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे. उपनिरीक्षक अक्षय पाटील अधिक तपास करत आहेत.
2 दिवसांची पोलिस कोठडी: पोलिसांनी या डॉक्टर सह चारही आरोपींना एटापल्ली न्यायालयात हजर करण्यात आले असता. पुढील तपासासाठी न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
डॉक्टराची तात्काळ बडतर्फीचा निर्णय: रुग्णवाहिकेतून अवैध दारूची वाहतूक करण्याऱ्या डॉक्टरांवर पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. ब्रम्हानंद पुंगाटी यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. यात सहभागी अन्य कर्मचारी रडारवर आहेत. त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…