पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
दिनांक २१/०९/२०२२ रोजी मुलगी नागे अंकिता बाबासो लाड यांनी भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की, शानगिरी ज्वैलर्स सिहंगड कॉलेज रोड, चिंतामणी रेसिडन्सी पुर्ण येथे दिनांक १८/०९/२०२२ रोजी सांयकाळी १९/२० ते १९/३५ वा चे दरम्यान दोन अनोळखी महीला दुकानात आल्या होत्या. सदर वेळी त्यांनी सोन्याची चैन दाखविण्यास सांगून, हातचलाखी करून एक सोन्याची चैन चोरून नेली. सदरची बाब फिर्यादी मुलीस दुकान बंद करताना लक्षात आल्याने तीने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहून तीची खात्री झाल्यानंतर तक्रार दिल्याने भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६१० / २०२२ भादवि कलम ३७९.३४ अन्वये गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे हे करत आहेत. तपास पथकाचे कर्मचारी मितेश चोरमोल व अभिनय चौधरी यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेजच माध्यमातून तपास केला असता, गोपनीय बातमीदारामार्फत त्यांना मिळालेल्या माहीती नुसार सदरची चोरी ही सुचित्रा किशोर साळुंखे वय ५० वर्षे, रा. केशवनगर, शिंदे वरती, मुढया पुणे व सौ. कोमल विनोद राठोड वय ४५ वर्षे, रा. व्हिआयटी कॉलेज जवळ, अप्पर इंदीरानगर पुणे यांनी केल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदरची माहीती मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविले नंतर तपास पथकाचे कर्मचारी अशिष गायकवाड, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले व महीला पोलीस कर्मचारी रसाळ यांना महीलांना आणण्यासाठी रवाना झाले. सदर महीलाना आणून त्यांकडे सखोल तपास केला असता त्यांनी एकमेकांचे सहायाने गोवा राज्य वॉस्को, हैद्राबाद राज्य पंजगुटा, फलटण व कात्रज बस स्टॉप येथे चो-या केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या वस्तु अम्दीन सोळंकी रा. येरवडा पुणे यास विक्री करत असले बाबत सांगितलेने त्यास ही अटक करण्यात आली असून त्याचकडून सोन्याची चैन व सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. सदरचे मंगळसूत्र हे कात्रज बस स्टॉप येथून एका वृध्द महीलेच्या गळ्यातील चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून सदर बाबत भारती विदयापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. ५५१/ २०२२ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत.
सदरची कामगिरी श्री. सागर पाटील, पोलीस आयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, श्रीहरी बहीरट, वरिष्ट पोलीस निरीक्षक, विजय पुराणिक पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक शिंदे, पोलीस अनलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व विक्रम सांवत, यांचे पथकाने यांनी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस ठाणे,
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…