उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्यावतीने सुरू असलेला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास पावन पर्व अनुषंगाने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक सुहास धोत्रे यांच्या हस्ते करुनेचे महासागर तथागत भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप, दीप आणि पुष्प यांनी अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी विहाराचे सहखजिनदार जगन्नाथ आठवले यांनी सर्व उपस्थित उपासक, उपासिका संचालक मंडळ यांचे रविवारच्या सत्रा मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम स्वागत केले तसेच बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक सुहास धोत्रे यांचा परिचय थोडक्यात करून दिला. त्यानंतर विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांच्या हस्ते प्रमुख वक्ते सुहास धोत्रे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख वक्ते यांनी बौद्ध धम्माची चळवळ मोठी आणि विस्तृतपणे वाढवायची झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा घेते वेळेस दिलेल्या दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. याचे पालन केले तर समाज श्रद्धाशील होऊन जो समाज अंधश्रद्धेकडे झुकला आहे तो हळूहळू जो मंदिराकडे झुकत आहे त्याचे प्रमाण कमी होऊन बौद्ध धम्माचे पालन व्यवस्थित करू लागेल. धम्माची सुरुवात ही आचरणाने स्वतःच्या घरामधून सुरुवात करून नंतर ती आपल्या सभोवताली असलेल्या शेजारीपाजारी यांना शांती संयम, संतुषटी आणि धम्म कशा प्रकारे महान आहे, याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेला मूलमंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा याची जोपासण करणे आवश्यक आहे. परंतु शिकतात, संघटित होतात, संघर्ष करता परंतु संघटना जास्त प्रमाणात काढल्या जात आहेत त्यामुळे हेवेदावे याचे प्रमाण वाढवून आपापसात भांडत आहेत. मूळ मंत्राला संघटित न होता बगल दिली जात आहे, ही खरोखर शोकांतिका आहे. त्यामुळे तृष्णेवर विजय मिळवणे आवश्यक आहे. तो मिळवायचा असेल तर चार आर्य सत्य समजून उमजून घेणे आवश्यक आहे. तृष्णा लालची वृत्तती याचे वर विजय मिळवायचा असेल त्रिसरण, पंचशील, अष्टशील, दसशील आर्य अष्टांगिक मार्ग याचे पालन करणे बाबत आवाहन केले. तरच माणूस निबाण तथा निर्वाण प्राप्त करू शकेल. प्रत्येकाने मी पणा सोडला तर नक्कीच मतभेद होणार नाही आणि आपला समाज संघटित होऊन एक ना एक दिवस संपूर्ण भारत बौद्धमय होऊन जाईल. तसेच त्यांनी त्यांच्या मनाला खूप भावलेला एक लेख वाचन करून दाखविला. एकी हेच बळ आहे आणि हे बळ सर्व अन्यायवादी आणि राक्षसी प्रवृत्तीच्या समाजाला गाडल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे एकजूट दाखवून समाज परिवर्तन करावे, अशी विनंती केली आणि त्यांच्या वाणी त्यांनी पूर्णविराम दिला.
त्यानंतर विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी अध्यक्ष अध्यक्षीय भाषण केले. त्यानंतर विहाराच्या संचालिका अवंतिका वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानून धम्मपदाची गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमास विहाराच्या संचालिका शैलजा साबळे, उषा कांबळे, अवंतिका वाघमारे, शेळके ताई, सरकार ताई, एस. आर. माने, सी .बी. चौधरी विहाराचे सचिव पवन वाघमारे, सहसचिव भारत कदम, पवन कदम, सामाजिक नेते उत्तम आबा कांबळे माजी संचालक सावंता काटे, बोधिसत्व धम्मरत्न बोरखडे, तसेच ऍड. संजीव साबळे इत्यादी माता बंधू भगिनी उपासक उपासिका सदस्य उपस्थित होते.
दिनांक 18 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त विहारामध्ये डॉ. ऍड. सुगंध वाघमारे पलूस भारतीय बौद्ध महासभा यांची धम्मदेशना होणार असल्याने सायंकाळी सहा ते आठ या वेळेत उपस्थित राहावे. कार्यक्रमा नंतर भोजनदान आयोजित केले आहे त्याचाही आस्वाद घेण्याची विनंती केली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…