राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पोंभूर्णा:- कुठलेही क्लास न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोंभूर्णा तालुक्यातील आंबेधानोरा येथील वडील घरबांधकाम मजुर व आई शेतमजुरी करणाऱ्या दाम्पत्याचा मुलगा कुणाल संतोष रेगुलवार यांने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरून कुणालने पीएसआय पदाला गवसणी घातल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पाच वर्षांत अनेक अपयश आले.मेन्स क्लिअर झाल्यानंतर दोन वर्ष वाट पाहावी लागली. फिजीकल क्वालिफाय झाल्यानंतर ऐन मुलाखतीच्या १६ दिवसा अगोदर अपघात झाला. हाताला दुखापत झाली. तरी जिद्द न सोडता मुलाखती मध्ये महाराष्ट्रात टॉप केल्यानंतर पीएसआय बनण्याचा स्वप्न पूर्ण झालं. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कुणाल संतोष रेगुलवार वय 26 वर्ष यांनी पोलीस उपनिरीक्षक बनून आपल्या गावाचा नाव रोशन केले आहे.कुणाल पीएसआय झाल्याने कुटुंबासह गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील आंबेधानोरा या खेडे खेड्यात कुणालचे परिवार वास्तव्यास आहे. कुणालच्या घरची परिस्थिती बेताची.आई मोलमजूरी तर वडील बांधकाम कामगार म्हणून काम करतात. तरीही आई वडिलांनी स्व:ता उपाशी राहून मुलांच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेतला.हि परिस्थिती बदलण्यासाठी अधिकारी बणण्याचं स्वप्न उराशी बाळगून कुणाल अभ्यासात लक्ष देऊ लागला.पहिली ते दहावीचे शिक्षण गावातील आश्रमशाळेत झाले. अकरावी व बारावीचं शिक्षण मुल येथे तर ग्रॅज्युएशन नागपूरमध्ये पुर्ण झाले. अभ्यास करण्यासाठी मित्राकडे नाशिकला गेल्यानंतर कुणालने तिथे सेल्फ स्टडी केली. कोरोनामध्ये प्रकृती बिघडली व त्याला गावाकडे यावं लागलं.२०२१ पासून बरेच परिक्षा दिले पण अपयश मिळत होतं. ८ ऑगस्ट २०२२ मध्ये पीएसआय मेन्स काढली.पण दोन वर्ष गॅप पडलं. ३० मे २०२४ ला फिजकल क्वालिफाय झाला. १८ जुलैला मुलाखतीची तारीख निश्चित झाली. आणि मुलाखतीच्या पुर्वी २ जुलैला मोठा अपघात झाला. घरच्या गरिब परिस्थितीची जाणीव असलेल्या कुणालने हार मानली नाही. तो प्रयत्न करुन मुलाखतीला समोर गेला व त्याने पीएसआय पदाला गवसणी घातली. गरीबीवर मात करत कुणाल रेगुलवार यांनी हे यश मिळवीले ते यश सहज सोपे नव्हतेच.
राहुल कालबोगवार, सिमा गणवीर, रुपेश चेंदे, नितेश जिल्लेवार, जितेंद्र श्रीरामलूवार, शुभम बंडिवार, आदित्य वाळके, गौरव गलोले, रोहित खोब्रागडे, सुरज ठाकरे, प्रमोद भुरसे, प्रदिप रेगुलवार या मित्रांनी कुणालला संघर्षाच्या काळात साथ दिली सपोर्ट केला. पुस्तके घेणे असो, फि भरण्याचा विषय, की अपयशा नंतर धीर देण्याचा विषय असो या मित्रांनी त्याला सांभाळलं आहे.
कुणालचे आई वडील शेतमजूरी करून संध्याकाळी दमून घरी आले आणि दारात असतानांच कुणाल फौजदार झाल्याची बातमी कळली. आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि आपल्या कष्टाचे चीज झाले असल्याच्या भावनाने आनंद द्विगुणित झाले. आयुष्यभर गरिबीत दिवसंं काढलो, जीवाचं रान केलो, मुलांच्या पंखासाठी मजूरी केली, मिळेल ते काम केले आणि मुलाने आमच्या कष्टाचे सोने केले. पोरगा पीएसआय झाल्याने अभिमान वाटत असल्याची भावना आई सविता व वडील संतोष रेगुलवार यांनी व्यक्त करीत आहेत.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…