लम्पी रोग : चंद्रपूर जिल्ह्यातील 8 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित, 5 किलोमीटर परिसरातील 60 गावे सतर्कता क्षेत्रात.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर,दि.22 सप्टेंबर:- महाराष्ट्रात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधनामध्ये लम्पी स्कीन डिसीज लागन झाल्याचे रोग लक्षणावरून निदर्शनास आले आहे.

लम्पी स्कीन डिसीजमुळे जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील मौजा आर्वी व रामपुर, कोरपना तालुक्यातील सांगोडा,भारोसा व कोठोडा, जिवती तालुक्यातील मौजा जिवती, शेणगांव व येल्लापूर ही 8 गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात धोपटाळा, माथरा, सास्ती, राजुरा, बामणवाडा व चुनाळा ही गावे तर मौजा आर्वी सतर्कता क्षेत्रात सुमठाणा, खामोणा, अहेरी, गोयेगाव, अंतरगाव (खुर्द), बोडगाव,कापणगाव ही गावे समाविष्ट आहे.

जिवती तालुक्यातील मौजा जिवती परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात गढपांढरवाणी, आसापूर, नागापूर, धोंडाअर्जुनी, मोहाडा, मरकलमेटा, धारपणा, येरमी येसापूर व पकडीगुड्डम, मौजा शेणगांव परिसरातील पल्लेझरी, माथाडी, राहापल्ली खुर्द, राहापल्ली बुजुर्ग, करकागोंदी, हिरापुर, टेकाअर्जुनी, धोंडा मांडवा, घाटराहीगुडा, घणपठार, हटकरगुडा तर मौजा येल्लापूर परीसरातील लांबोरी, कमलापूर, महाराजगुडा, नारपठार, येल्लापूर(खुर्द), ही गावे समाविष्ट आहे.

कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात अंतरगाव, गाडेगाव (वि.), विरुर गाडेगाव, कढोली, कारवाई, वनोजा, सोनूर्ली, हिरापूर ही गावे मौजा भारोसा परिसरातील एकोडी, भोयेगाव, बोरगाव, इरई, जैतापूर व मौजे पिंप्री धानोरा व उसगाव ही गावे तर मौजा कोठोडा परीसरातील गोविंदपूर, परसोडा, दुरगडी, शिवापूर, पार्डी, रुपापेठ, खडकी ही गावे समाविष्ट आहे.

या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गीय जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने आदी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच बाधित गावामध्ये बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याकरीता व खाण्याकरिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची ऑनलाइन पद्धतीने होणारी खरेदी-विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी.

बाधित परिसरात संबंधित ग्रामपंचायतींनी स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड आदींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लम्पी स्कीन रोगाचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य बनवणाऱ्या संस्थेमार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे. वळुंची चाचणी करून रोगाकरीता नकारार्थी आलेल्या वळुंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरीता वापर करावा. लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांच्यामार्फत त्यांच्या भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी.

उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचे विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago