मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज बुधवार ला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचे स्मृति दिनाचे औचित्याने त्यांचे जूने सहकारी पंचायत समितीचे माजी सभापती वासुदेवराव गौळकार यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन स्व.शरद काळे यांचे सामाजिक, राजकीय, जीवनाचा सरीपाट हा कसा जनसेवेकरीता होता हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत नवतरुणाई पिढीने ते कार्य पुर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्व.शरद काळे यांचे पुत्र तथा वर्धा जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे हे होते. तर प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अतुल वांदिले, हिंगणघाट तालुकाध्यक्ष महेश झोटींग, दशरथ ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते शालिकराम डेहणे, राजू मंगेकर, राकाँचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोक वांदिले, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, शहराध्यक्ष बालू वानखेडे शिवसेना उबाठा युवानेते अभिनंदन मुनोत, सुनिल आष्टीकर तथा धामनगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ. सुषमा विशाल गौळकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजनाप्रसंगी वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व स्व. शरद काळे यांचे स्वप्नातील अपूर्ण असलेले लोकोपयोगी कार्य खासदार म्हणून समोर नेण्यासाठी आलेली जबाबदारी स्वार्थीकी लावावी असा हितोपदेश सहकार नेते तथा पं.स.माजी सभापती वासुदेवराव गौळकार यांनी सत्कार करतांना व्यक्त केली.
प्रसंगवश बोलतांना खा. अमर काळे म्हणाले कि माझ्या रक्तातचं देशसेवा, समाजसेवा, जनसेवा असल्याने मी वडोलोपार्जित वसा समोर नेत आहे म्हणूनच आमदार असतांना जनतेनी मला आमदार पदावरुन एकदम खासदार या जबाबदारीची धूरा सोपविली ती जनसेवक जबाबदारी आपल्या आशिर्वादाने यशस्वी होईल असा अभिप्राय व्यक्त करत वडिलांचे स्मृति दिनी मला हे आठवण करुन देत माझ्या जेष्ठ मंडळीचे हे ऋणानुबंध सदैव स्मरणात ठेवूनचं कार्यरत राहिल असा आशावाद बोलून दाखविला.
यावेळी अतुल वांदिले, शालिकराम डेहणे यांनी आपले समोयचित विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन लोजपाचे विदर्भ संघटक केशव तितरे यांनी केले तर आभार प्रदर्शन चेतन काळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अमोल बोरकर, साहेबराव येडे, देविदास गावंडे, ओमप्रकाश मुडे, राजेंद्र ठाकुर, नारायण मोघे, राजू गौळकार, नामदेव फाले, संजय शहाणे, सौ.श्रध्दा अमोल गौळकार, चेतन वाघमारे, दामोधर वानखड़े, राजु मुडे, निखिल ठाकरे, जावेद मिर्जा, पाशू परवेज बेग मिर्जा, आदीने सहकार्य केले.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…