अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 20 सप्टेंबर:- शहरात हायवे वर वाढत्या दुर्घटनेमुळे तसेच नशा करून कार, मोटर सायकल चालविण्याच्या प्रमाणात, स्टंटबाजीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना निदर्शनात येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
अपघाताची दुर्दैवी घटना: हेटी शिवारात मोटर सायकलने 19 तारखेला सायंकाळी शेतातून चारा घेऊन येत असताना दारू पिऊन विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटार सायकल चालकाने धडक दिल्याने एकाच्या जागीच मृत्यू तर धडक मारणारा जखमी झाला आहे. ही घटना हेटी शिवारात सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. वासुदेव धोंडबा बोबडे वय 65 वर्ष रा.महाजन लेआउट सावनेर असे मृतकाचे नाव आहे तर राजकुमार सूर्यवंशी रा. मोहतकार (सावळी) असे धडक देणाऱ्या जखमीचे नाव आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि मृत्युदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. 20 तारखेला राम गणेश गडकरी मोक्षधाम येथे वासुदेव धोंडबा बोबडे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…
वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील येरवडा येथून एक धक्कादायक…