विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्वच्छ भारत अभियान च्या 10 व्या वर्धापन दिना निमित्त केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, केंद्रीय पेयजलं व स्वच्छता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबवण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत नगर पंचायत मुख्याधिकारी प्रणय तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत एटापल्ली क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
पर्यावरण पूरक उत्सव या घटकामध्ये ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ ऐटापल्ली व नगर पंचायत ऐटापल्ली याच्या संयुक्त विद्यमाने कानिका माता मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, निलिमा खोब्रागडे वनपरीक्षेत्र अधिकारी, प्रणय तांबे मुख्याधिकारी, तुपेश उईके वैद्यकीय अधीक्षक, गणेश मंडळाचे सचिव संपत पैडाकुलवार, कोषाध्यक्ष उमेश संगर्ती, स्पर्धा प्रमुख अमोल गजाडीवार आणी नगर पंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.
सफाईमित्र सुरक्षा शिबीर या घटकांतर्गत सर्व सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरा मध्ये नियमित आरोग्य तपासणी तसेच शुगर, ब्लड प्रेशर, मलेरिया, वॅक्सिनेशन, ईसीजी, सीबीसी आणी नेत्र तपासणी नगर पंचायत ऐटापल्ली कार्यालयात करण्यात आली.
जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्या साधून जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आनि ग्रामीण रुग्णालय ऐटपल्ली प्रांगणात ब्लॉक स्पॉट ची लोकसहभागातून श्रमदानातून सफाई करण्यात आली. या श्रमदानात बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक किसन हिचामी, नगरसेवक राहुल कुळमेथे, मुख्याध्यापक विनय चौहान, प्राध्यापक गणेश आत्राम व नगर पंचायत एटापल्ली येथील अधिकरी व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षकवृंद आणी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच येणाऱ्या आठवड्यात विविध उपक्रम जसे कि स्वच्छता रॅली, वृक्षारोपण, प्लॅस्टिक बंदी ड्राईव्ह, ब्लॅक स्पॉट सफाई ई. उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…