उच्चविद्याविभूशित कारागिरासह 18 प्रकारच्या सामान्य लाभार्थी कारागिरांची उपस्थिती.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 कलाकृतींच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीला वर्धेच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्टॉलवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या 10 लाख रुपयाच्यावर वस्तूची खरेदी केली.
ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेल्या पारंपारिक कारागरी आणि हस्तकलाकारांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींची माहिती सामान्य नागरिकांपर्यत पोहोचावी व त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शनी व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले. या प्रदर्शनी मध्ये भारतातील उत्तराखंड, बिहार, नागालँड, मध्यप्रदेश, केरळ, ओडीशा, झारखंड, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, आसाम, तेलंगणा, पंजाब, उत्तरप्रदेश, जम्मू आणि कश्मीर, महाराष्ट्रात, कर्नाटक, राजस्थान व गुजरात राज्यातील हस्तकला कारागीरांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनीत लावून विक्री केली.
जम्मू काश्मिर येथील उच्च विद्याविभूषित टेलरींग कलाकार रुमी जान यांना मिळाले पीएम विश्वकर्मा योजनेचे बळ. जम्मू काश्मिर येथील उच्च विद्याविभूषित असलेल्या रुमी जान यांनी सुरवातीस आपल्या पारंपारिक टेलरींगच्या छोट्या व्यवसायास सुरवात केली. मागील वर्षी केंद्र शासनाने सुरु केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेची माहिती मिळाल्यावर योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असल्याचे श्रीमती रुमी जान यांनी सांगितले. योजनेंतर्गत माझा अर्ज मंजूर झाल्यानंतर मला टेलरींग व्यवसायाचे 6 दिवसाचे प्रशिक्षण शासनाच्यावतीने मिळाले त्यादरम्यान मला 4 हजार रुपयाचे मानधन सुध्दा मिळाले असून व्यवसाय सुरु करण्याकरीता 1 लाख रुपयाचे कर्ज सुध्दा मिळाले असे त्यांनी सांगितले. या कर्जातून मी मोठा व्यवसाय सुरु केला असून शाल, उनी वस्त्र, घरगुती वापराचे वस्त्र यासारख्या वस्तू तयार करीत असून मला चांगला आर्थिक लाभ मिळाला आहे. या प्रदर्शनीत वर्धेकरांचे चांगले सहकार्य मिळाले असल्याचे रुमी जान यावेळी म्हणाल्या.
पंढरपूर येथील पीएम विश्वकर्मा योजनेची लाभार्थी निरंजन पानकर या तुळशीमाळ कारागिरांनी तयार केलेल्या तुळशीमाळ स्टॉलला वर्धेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून लाभार्थ्यांच्या वतीने स्टॉलवर तुळशी वृक्षापासुन माळा तयार करुन विक्री होत असल्यामुळे नागरिकांचा मोठा उत्साह पहावयास मिळाला.
गुजरात व मध्य प्रदेश येथील सोनार या कारागीरांची चांदीवर्क मुर्ती कलेची दोन दिवसात 1 लाख रुपयांच्यावर विक्री झाली असल्याचे कारागीरांनी सांगून त्यांनी तयार केलेल्या मुर्ती कलेला वर्धेकरांनी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले. या प्रदर्शनीला 20 हजार प्रेक्षकांनी भेट देऊन कारागीरांनी तयार केलेल्या वस्तुचे व उत्कृष्ट अशा प्रदर्शनीचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी २१ व २२ सप्टेंबर दोन्ही दिवस प्रदर्शनात उपस्थित राहून कारागिरांच्या भेटी घेतल्या. त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यावर जातीने लक्ष दिले. तसेच प्रोत्साहनही दिले. प्रशासनाच्या या व्यवस्थेने व आदरतिथ्याने देशभरातून आलेले कारागीर भारावून गेले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…