अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….

दिनांक २२/०९/२०२२

पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी

१) दि. २१/०९/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ पथकातील स्टाफ कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना, शिव प्लाझा इमारत बि-विंग समोरील खडीमशीन चौकाकडुन सोमजी चौकाकडे जाणा या सार्वजनिक रोडवर सोमजी बस स्टॉप जवळ, कोंढवा बुद्रुक पुणे येथे इसग नागे इस्माईल दावलसो बडेघर, वय ४८ वर्षे, रा. पाटील वस्ती, दांडेकर नगर, आलीम गॅरेज जवळ, येवलेवाडी, कोंढवा खुर्द, पुणे हा गांजा विक्री करीत असले बाबत माहित मिळाली.
सदर बातमीच्या अनुशंगाने त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात २२.५६०/- रू किया ०१ किलो १२८ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता अनाधिकाराने, बेकायदेशिर रित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्याचेविरुद्ध कोंढवा पो स्टे गुरनं. ९५६/२०२२ एन.डी.
पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २) दि.२१/०९/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ पथकातील स्टाफ बिबवेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने माहिती काढणे करीता पेट्रोलिंग करीत असताना श्रीजी लॉन कॉर्नर समोरील सार्वजनिक रोडवर काकडे वस्ती, कोंढवा, पुणे येथे इसम नामे आकाश देवराम पांडियन, वय २४ वर्षे, रा. फ्लॅट नं.५. वि. विंग, वर्धमान सोसायटी, मिठानगर, कोंढवा, पुणे हा एग. डी. हा अंगली पदार्थ विक्री करीत असलेबाबत गाहिती गिळल्याने, त्यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात १,५७,२०० /- रु किचे १० ग्रॅम ४८० मिलीग्रॅग गेफेड्रॉन (एम.डी.). एक मोबाईल हॅण्डसेट १५,०००/ रुकिची ७०,०००/- रू किची करीइमा गाडी २,०००/- रूपये रोख रक्कम ४,००,०००/- रू किची स्कोडा चारचाकी गाडी १,०००/- रु किची इलेक्ट्रोनिक वजन काटा असा एकुण ६.४५,२००/- रूपये किया ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. सदरचा अंमली पदार्थ हा अटक आरोपी याचा साथीदार याने विक्रीकरीता दिला असुन अंगली पदार्थ विक्रीबाबत दोघांचे संगनगत असल्याने त्याचे विरुद्ध बिबवेवाडी पो स्टे गुरनं. १७६ / २०२२, एन. डी.
पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). ८ (क). २२(ब). २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुका श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे-१, श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढंगले सहा पो निरीक्षक शैलजा जानकर, पोलीस अमलदार मारुती पारधी, संदिप जाधव, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, सचिन माळचे संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago