उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ, श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावास पावन पर्व च्या अनुषंगाने भाद्रपद पौर्णिमेनिमित्त रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेमध्ये उत्तम आबा कांबळे ज्येष्ठ समाज सुधारक सामाजिक कार्यकर्ते तसेच जेष्ठ पत्रकार सुरेंद्र दुपटे यांनी करुणेचे महासागर तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र दुपट्टे तसेच ज्येष्ठ समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उत्तम आबा कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस धूप दीप पुष्प यांनी अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम विहाराचे सहसचिव जगन्नाथ आठवले यांनी प्रास्ताविक करून आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तरपणे सांगितली. सर्व उपस्थित उपासक, उपासिका, माता बंधू भगिनी संचालक मंडळ यांचे स्वागत करून रविवारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या. विहाराचे ज्येष्ठ संचालक सी. बी.चौधरी यांनी थोडक्यात धम्मदेशना देण्याबाबत त्यांनी विनंती केली.
दिनांक 18 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या भाद्रपद पौर्णिमेस महाकारूणीक तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये घडलेल्या चार घटना विषद केल्या. भाद्रपद पौर्णिमा ही वर्षावासाच्या काळामध्ये येते. वर्षावासाच्या काळामध्ये उपोसथव्रत्त धारण केले जाते. उपोसथव्रत चे महत्त्व आणि फायदे तसेच येणारी अनुभूतीची महिती थोडक्यात सांगण्यात आली. वैशाली येथे महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध असताना जेव्हा भिक्खू संघामध्ये आपापसात वाद होत असे त्यावेळी दोन गटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. भगवान बुद्ध यांनी वरिष्ठ भिक्खूंना शांत करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांचा वाद चालूच राहिला त्यामुळे भगवान बुद्धांनी वादातीत असलेल्या भिक्खूना धडा, अद्दल शिकवण्यासाठी निर्णय घेतला. आणि ते विहार सोडून एकटेच जंगलामध्ये गेले आणि तेथील प्राण्यांसोबत राहू लागले. हत्ती, माकडे, पोपट इत्यादी प्राणी त्यांना मध, फळे, कंदमुळे ई. आणून देत असत. ही घटना भाद्रपद पौर्णिमेस घडलेली आहे.
दुसरी घटना भगवान बुद्ध हे जेतवनात वास करीत होते त्यावेळीस राजा प्रसेंनजीत यांनी भगवान बुद्धांना जाऊन वंदन केले त्यावेळी भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला उपदेशामध्ये त्यांनी सांगितले की आपली चांगली किंवा वाईट कर्मे सावली प्रमाणे आपला पाठलाग करीत असतात. त्यामुळे मैत्री, करुणा, मुदिता, पूर्ण ह्रदयाची सर्वाधिक आवश्यकता आहे. आपण आपले एकुलता एक पुत्राला जसे सहृदयाने सांभाळतो त्याप्रमाणे आपल्या प्रजेचा सांभाळ केला पाहिजे. दुसऱ्याला खाली ओढून स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. राजकीय थाटामाटास महत्त्व देऊ नये. राजधर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा. कोणावरही अन्याय करू नये. कामागणीचे भय सर्वांसाठी समान आहे. जो एक वेळ त्या भोव-यात फ़सेल त्याला बाहेर निघणे कठीण आहे. स्वतःच्या विचारावर नजर ठेवणे आवश्यक आहे. धम्माची अशी मागणी आहे की, माररुपी शत्रूपासून दूर राहून स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. भौतिक वस्तूच्या तूच्छतेवर खोलवर विचार करणे आवश्यक आहे. राजधर्म पाळावा. त्याच्या नीतीनियमाचे उल्लंघन करू नये. काटेकोर पणे पालन करावे. बाह्यपदार्थास आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता प्रसन्नतेचा आधार बनवावे. म्हणजे राजाचे यश भविष्यकाळात अमर होईल. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी राजा प्रसेनजीत यास उपदेश केला आहे.⁰
तिसरी घटना म्हणजे याच पौर्णिमेस राजा अजातशत्रूची भेट भगवान बुद्धा सोबत झाली आणि तो राजा भगवान बुद्धाचा उपासक बनला. चौथी भाद्रपद पौर्णिमेची घटना म्हणजे तथागत भगवान बुद्ध राजगृह येथे वास्तव्यास होते, तेव्हा राजा शुद्धोदनला आपला मुलगा भगवान बुद्ध याची भेटण्याची इच्छा झाली, त्यांनी तथागतास आपल्या पित्ताचा निरोप पाठविला. भगवान बुद्धास निरोप मिळाल्यानंतर ते आपल्या पाचशे शिष्यासह कपिलवस्तूला भेट देण्यासाठी गेले, त्यांनी कपिलवस्तूमध्ये गेल्यानंतर आश्रम शाळेत निवास केला आणि दुसरे दिवशी सकाळी भिक्षाटन केले. त्यावेळी राजा शुद्धोदन भगवान बुद्धांना म्हणाले तू राजवंशाचा असून भिक्षाटन का करीत आहेस. त्यावेळेस भगवान बुद्धांनी आपल्या पित्याला नम्रपणे सांगितले की, मी आता तुमचा राजपुत्र नसून बुद्ध वंशाचा आहे. तुम्ही भोजनाचे निमंत्रण दिल्यानंतर आपले भोजन स्वीकारिन तसेच त्यांनी आपली पत्नी यशोदारा हिच्या कक्षामध्ये जाऊन तिची भेट घेतली. तसेच पाच वर्षाच्या राहुल राहुलने आपल्या पित्याला वारसा हक्क मिळण्यास विनंती केली.
यावेळी सुरेंद्र दुपटे यांना राज्य शासनाकडून विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त केल्याबद्दल विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी त्यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. विहाराचे संचालक संजय घाडगे यांनी बहुजनाच्या शैक्षणिक क्रांतीचे महानायक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले तसेच पटवर्धन हायस्कूलचे उप मुख्याध्यापक काल कथित राहुल संबोधीयांचे दुख:द निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण अभिवादन करून आदरांजली वाहिली तसेच कलानगर येथील हौसाबाई रामचंद्र कांबळे यांचे काल रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे उद्भवलेल्या प्रसंगाचे सावधानतेने भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य दयानंद कांबळे यांनी अग्निसंस्कारच्या वेळी प्रबोधन करून सोन्याची बोरमाळ विहारास दान करणे बाबत विनंती केली त्यामध्ये विहाराचे संचालक संजय गाडगे तसेच कवठेकर यांनी सहभाग घेतला होता. काल.काथित हौसाबाई रामचंद्र कांबळे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. विहारास दान करण्यात आलेल्या सोन्याच्या बोरमाळ बाबत सोनाराकडे जाऊन व्हॅल्युएशन करून जी किंमत त्याची पावती करून त्यांना देऊन आभार अभिनंदनचे पत्र तसेच पुण्यानुमोदन कार्यक्रमास सर्व कार्यकारी मंडळ व संचालक उपस्थित राहून अभिवादन करणे बाबत विनंती केली. ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र दुपटे यांनी त्यांचा सत्कार केल्या बाबत विहाराच्या कार्यकारणीचे आभार मानले. विहारा मार्फत केलेला सत्कार हा मानाचा आणि सर्वात मोठा सत्कार असल्याचे मनोगत त्यानी व्यक्त केले. धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमास संचालिका अवंतिका वाघमारे, उषा कांबळे, एडवोकेट संजीव साबळे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व समाज सुधारक उत्तम आबा कांबळे ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र दुपटे पवन भारत कदम विहारा चे सहसचिव भारत कदम विहाराचे सदस्य रवींद्र सदानंद एमएसईबी चे अभियंता अशोक वाघमारे इत्यादी उपासक उपासिका माता बंधू भगिनी उपस्थित होते.
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…