तीनही खेळाडूची शालेय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेकरिता निवड, भारत विद्यालयाच्या मानात 3 सुवर्ण पदकाचा शिरपेच.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था वृंदावन अंतर्गत सुरू असलेल्या 35 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत भारत विद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते. यात 17 वर्षाखालील 44 किलो वजन गटात भक्ती रवींद्र दुरबुडे, 17 वर्षाखालील 63 किलो वजन गटात रुचिता रवींद्र शेंडे व 19 वर्ष गटाखालील वजन गटात 36 किलो मध्ये मानसी राजेंद्र गाठे या तीनही खेळाडूंनी 19 व 17 वर्षाखालील गटात जोरदार खेळाचे प्रदर्शन करीत राष्ट्रीय पातळीवरील 35 व्या अखिल भारतीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. आणि आपली निवड शालेय राष्ट्रीय ज्युदो स्पर्धे करता केली आहे. यासोबतच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व भारत विद्यालयाच्या मानात सुवर्णपदकाचा शिरपेच चढविला आहे.
या तीनही खेळाडूच्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्यामभाऊ भिमनवार, सचिव रमेशराव धारकर, सर्व संचालक मंडळ, विद्याभारती विदर्भ व देवगिरी प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी, जितेंद्र घोरदडेकर खेलकुद संयोजक विद्याभारती विदर्भ प्रांत , तथा शाळेचे मुख्याध्यापक राजू कारवटकर, उप मुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षिका निलांशी बुरीले, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर, संदीप चांभारे, रंजना चौधरी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली…
एक पाऊल तरुणाईचे,भविष्य घडविण्याकडे- चंद्रपाल चौकसे पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन…
गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात 11 नवीन शासकिय वैद्यकिय…