अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सामाजिक कार्यकर्त्या मंगला ठक यांच्या नेतृत्वात गेल्या 14 दिवसापासून चिघळत असलेल्या धरणे आंदोलनाची आज शासनाने घेतली दखल घेतली आहे. निराधार, शेतकरी व असंघटित वर्गाच्या मागण्याची आज शासन दरबारी दखल घेऊन आंदोलन मागे घेण्यास प्रशासनाने दरबारी बोलवण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक निराधार अत्याच्यार मुक्ती संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगला ठक यांच्या नेतृत्वात गेल्या 10 सप्टेंबर पासून तहसील कार्यालय हिंगणघाटचे समोर धरणे आंदोलन सुरू आहे. 14 दिवस होऊन गेले परंतु सरकार व प्रशासन दखल घ्यायला तयार नव्हते. अनेक गावातून पुरुष बांधव व महिला भगिनी व अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या व मागण्या रास्त असल्याचे बोलले. अनेक सिनेकलाकाराणी व्हिडिओच्या माध्यमातून मंगलाताई ना पाठिंबा दिला. तर काही नागपूर वरून काही मारेगाव यवतमाळ वरून सुद्धा मित्र परिवार या आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलन जास्तच चिघळू लागलं होत.
शेवटी आज 23 सप्टेंबर ला शासनाने दखल घेतली आणि शासन दालनात आंदोलनाचे शिष्ट मंडळ बोलवून चर्चा करण्यात आली. यात तहसील लेवल चे प्रश्न तहसील लेवल लाच निकाली करणार असे सांगितले व राज्य सरकार व केंद्र सरकार कडे निराधार संघटनेच्या मागण्या न्याय मागण्या साठी पाठविनार अशी ग्वाही देऊन आज आंदोलन का शी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले.
या आहे मागण्या:
1) ५५ वर्षावरील वयोवृध्द निराधार व शेतकऱ्यांना ५००० रु. महिना मानधन मिळावा.
2) निराधारांची उत्पन्न मर्यादा २१००० वाढून ५० हजार करण्यात यावी निराधारांना व शेतकऱ्यांना नियमित अनुदान मिळण्यात यावे.
3) घर तेथे शौचालय त्या प्रमाणे प्रत्येक राशनकार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेनेकरुन त्यांना घरघुती उद्योग करता येईल.
4) शेतकऱ्यांना मालाचा हमी भावाचा कायदा करणे बाबत.
5) शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायम स्वरुपी पट्टे मिळणे बाबत.
6) जबरण जोत शेतकऱ्याला व जमीन धारकाला कायम स्वरुपी जमिनीचे पट्टे देणे बाबत झुडपी अंतर्गत.
7) सरकारने घरकुल मध्ये ड क्रमांक यादी थांबवून गरजूंना घरकुल योजनेपासून वंचित केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता मंगला ठक यांचे नेतृत्वात निराधार, शेतकरी व असंघटित वर्गाचे धरणे आंदोलन तहसील कार्यालय हिंगणघाट येथे आज दिनांक 10 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली होती. सरकार अजुन जागे झालेलं नाही या वेळी अनेक गावच्या महिला भगिनी व बांधव या आंदोलनात सामील झाले होते. दिवाकर आसोले, गजानन भोमले, शेषराव भोयर, गीता भगत, मालू लोणकर, कुसुम नगराळे, सुमन भगत, व अनेक पुरुष माता भगिनी नी या धरणे आंदोलनात हजेरी लावली होती.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…