अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना महाराष्ट्र शासनाने रक्षा बंधनाच्या पहिले घोषणा करुन वयाच्या ६५ वर्षा खालील महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणुन प्रत्येक बहिणीला ३०००/- हजार रूपये अर्जासोबत जोडलेल्या राष्ट्रीय कृत बँकेच्या खात्यात यायला पाहिजे होते .पण ती रक्कम मायक्रो फायनान्स कंपनी, रत्नाकर बँक शाखा कळमेश्वर, जी.नागपूर, बंधन मायक्रो फायनान्स बँक, उत्कर्ष बँक, फीनकेअर बँक शाखा सावनेर व अन्य खाजगी बँकांनी कर्जाची कपात म्हणून बहिणीची रक्कम वळती केल्यामुळे लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिलेल्या आहेत.
तसेच या बँकांनी शासनाच्या व मुख्यमंत्री यांच्या आदेशाची अवहेलना केली आहे करिता या योजनेचे पैसे तात्काळ परत त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार सावनेर यांच्यामार्फत भगवानजी चांदेकर विभागीय अध्यक्ष जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती मार्फत देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळामध्ये छत्रपाल निकोसे, सुरेश कोळमकर, खुशाल छत्रे, रमेश पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…