नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब गणेशनगर तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न.

*माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून (30001/- रुपये) विशेष पारितोषिक.!!*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

*मूलचेरा:-* तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशनगर येथे नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब तर्फे भव्य फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.
या फुटबॉल स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल संघांनी सहभाग नोंदवला होता.
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवा वर्गाला क्रीडा स्पर्धेसाठी नेहमी पारितोषिके देत असतात व त्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.
नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब गणेशनगर येथील भव्य फुटबॉल स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या ‘गणेशनगर संघाला’ माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव महाराज यांच्या कडून विशेष पारितोषिक म्हणून शिल्ड व (30001/- तीस हजार रुपये) देण्यात आले तर द्वितीय क्रमांक विजेत्या ‘खुदिरामपल्ली संघाला’ शिल्ड व (20001/-वीस हजार रुपये) श्री.बादल शाह ग्रा.प.सदस्य यांच्या कडून देण्यात आले,तर शिल्ड व (10001/-दहा हजार रुपये) तृतीय क्रमांक विजेत्या ‘मथुरानगर संघाला’ गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख (शिंदे गट) यांच्या तर्फे तर चतुर्थ क्रमांक विजेत्या ‘जि.प.शाळा गणेशनगर संघाला’तसेच शिल्ड व (5001/-पाच हजार रुपये) नेताजी यंग स्टार फुटबॉल क्लब कमिटी तर्फे देण्यात आले.

यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गौरव बाला शिवसेना तालुका प्रमुख मूलचेरा,प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चा तालुका अध्यक्ष किशोर मल्लिक,संजीत मिस्त्री दिलीप मजुमदार, ग्रीस मंडल, मंगल मंडल, ललित गाईन,निरंजन मिस्त्री तसेच परिसरातील फुटबॉल प्रेमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago