प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज तथागत गौतम बुद्ध आणि बुद्धाचे शिष्य सारीपुत्त व महामुग्गलायन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे हिंगणघाट शहरात आगमन झाले. यावेळी हिंगणघाट शहरात बुद्धम सरणम गच्चामी च्या जय घोषाने संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
अविद्या आणि अज्ञानाच्या कठोर यातनेतून विश्वातील मानवी समूहाला मुक्त करून प्रज्ञा शील करुणा अहिंसा मैत्री व शांतीची शिकवण देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या श्रीलंका देशातून अस्थि धातू सोबतच तथागतांच्या सदधम्माचे धम्म सेनापती असलेले प्रमुख शिष्य सारीपुत्त व महामुग्गलायन यांच्या अस्थि धातू तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रा पुणे येथून 10 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.
मानवता व विश्वशांतीचे प्रतीक असणारी ही यात्रा महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून जाणार आहे. ही अस्थिकलश महायात्रा दिनांक 25 सप्टेंबर सकाळी हिंगणघाट शहरात आगमन झाले. यावेळी या पवित्र अस्थि कलशाचे रथातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्याचा दुतर्फा उभे राहून या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी भंते पुरुष महिला सह अनेकांनी अस्थिकलश चे दर्शन घेतले.
बुद्धांच्या अस्थीच्या दर्शनाचा लाभ: बुद्धांच्या अस्थी कलशच्या मंगलमय आगमना सोबतच भिक्खू संघाचे पदयात्रा हिंगणघाट येथे दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी उपासकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. हजारो उपासक उपासिका मनोभावे दर्शन घेऊन बुद्ध चरणी लीन झाले. अडीच हजार वर्षानंतर तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींच्या दर्शनाचा लाभ हिंगणघाट येथील उपासकांना मिळाल्याचे सांगण्यात आले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…