राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संपूर्ण राज्याचे राजपाठ हाकणारे मुंबई येथील मंत्रालय किती सुरक्षित आहे. यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडी करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मुंबई येथील मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. त्यांना कार्यालयात एका अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला व तोडफोडीचा प्रयत्न केला. मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर त्यांच्या नावाची पाटी आहे. ही पाटी काढून फेकून दिली. त्यामुळे मुंबई येथील मंत्रालय किती सुरक्षित आहे हे समजून येते.
मुंबईत संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरु होता. त्यात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची घरी निघण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी हा प्रकार घडला. मंत्रालयात 6 व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आहे. एक अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालया बाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून जोरजोरात आरडाओरडा सुरू केला यावेळी त्या महिलेने कार्यालयात असलेल्या कुंड्या फेकल्या आणि गोंधळ घालून ती तिथून पसार झाली.
कोण आहे ही महिला?: मुंबई मंत्रालयात गोंधळ घालणारी ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच कार्यालयच सुरक्षित नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. या महिलेचा आता शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…