आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 28: – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणुक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे या वेळी अधिक जबाबदारीने पालन करुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक दिवसाचे प्रशिक्षण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या उद्घाटन सभारंभात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, आर्वीचे उपविभागीय विश्वास शिरसाट, हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी वंदना संवरंगपते, उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपट खलाटे, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, अधिक्षक अनिकेत सोनवने, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. या सूचना संदर्भात कोणाला शंका असल्यास त्या संदर्भातील समाधान हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जाते. तंत्रज्ञानात होणारे बदल लक्षात घेता निवडणूक विभागातर्फे संकेतस्थळावर येणाऱ्या सूचना व त्याची अंमलबजावनी सर्वांनी दक्षतेने करावी, असे श्री.कर्डिले यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडन्यासाठी नेमुन दिलेली कामे समन्वयाने पारदर्शकपणे पार पाडावी असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत यांनी केले एकूण पाच सत्रामध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. यात उप जिल्हाधिकारी प्रियांका पवार यांनी उमेदवारी अर्ज पडताळणी, माघार, निवडणूक चिन्ह आदिबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी वंदना संवरंगपते यांनी निवडणूक व्यवस्थापन व नियोजन यावर मार्गदर्शन केले, उपविभागीय अधिकारी संपट खलाटे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, अनिकेत सोनवणे यांनी विविध बाबींवर मार्गदर्शन केले.प्रशिक्षणाला सर्व क्षेत्रिय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, निवडणूक विषयक कामे करणारे अधिकारी व कर्मचारी असे एकुण 300 अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार अतुल रासपायले यांनी केले.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 *पोंभुर्णा, दि. 09 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण…