उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय परिसर व गार्डनची केली स्वच्छता. सायकल रॅली काढून स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ठेवण्याचे केले आवाहन.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील माझी वसुंधरा नगर परिषद अंतर्गत इको क्लब, आदर्श हायस्कुल येथील सामाजिक वनिकरण परीक्षेत्र राजुरा अंतर्गत राष्ट्रीय हरित सेना, चंद्रपूर जिल्हा स्काऊट्स-गाईड्स कार्यालय अंतर्गत छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज स्काऊट्स युनिट, जिजामाता गाईड्स युनिट, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता ही सेवा -2024 मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेचे उद्दिष्टे म्हणजे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता यांचे पालन करणे. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, स्काऊट्स मास्तर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम उपजिल्हा रुग्णालय आयुष गार्डन व परिसर, तहसील कार्यालय अमृत गार्डन व परिसर येथे राबविण्यात आली. यावेळी नेफडो संस्थेचे नरेंद्र देशकर, श्रीरंग ढोबळे, मनोज कोल्हापुरे, कृतिका सोनटक्के, डॉ. अफरोज फातेमा, उप जिल्हा रुग्णालय येथील डॉ. माया गायकवाड, डॉ. सुरेंद्र डुकरे, डॉ. इर्शाद शेख, धनंजय वाघ, फार्माशिस्ट, सुनील चाफले, सुरेश गिरडकर सुरक्षा रक्षक, आदर्श शाळेतील रुपेश चिडे, रोशनी कांबळे, जयश्री धोटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सायकल व पायदळ रॅली काढून विध्यार्थीनी स्वच्छता ही सेवा मोहिमे अंतर्गत आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. स्वच्छता केवळ आपल्या घरापर्यंत मर्यादित नसावी तर आपला वार्ड, गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचाही विचार मनात व कृतीत ठेऊन स्वच्छता राखने हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन बादल बेले यांनी यावेळी केले.
उपजिल्हा रुग्णालय तर्फे विध्यार्थीना मास्क व हातामोजे देण्यात आले. जमा झालेला ओला – सुखा, प्लास्टिक कचरा संकलन नगर परिषद राजुरा तर्फे किशोर वरवाडे यांनी केले. यावेळी डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा, डॉ. सूरज जाधव, मुख्याधिकारी न. प. राजुरा, डॉ. अशोक जाधव, वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय राजुरा, चंद्रकांत भगत, जिल्हा संघटक स्काऊट्स, चंद्रपूर, दीपा मडावी, जिल्हा संघटिका, गाईड्स, चंद्रपूर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जाभूळकर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…