संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 29 सप्टेंबर:- लुईस पाश्चर संशोधकाच्या मृत्यू दिवसानिमित्त रेबीज लसीकरण जगभर साजरा केला जातो. आजही भारतात पंचवीस हजार लोक रेबीज रोगाला बळी पडून मृत्युमुखी पडतात. चिकीत्सा विज्ञान कितीही प्रगत झालं तरी अद्यापही रेबीज रोगाचा उपचाराच गमक संशोधकाना उमगल नाही. प्रतिबंधात्मक लसीकरण करूनच आपण ह्या रोगाचे समूळ उच्चाटन करू शकतो. केंद्र आणि राज्य शासन याबाबतीत ठोस पावले उचलत आहेत. या दिनाचे औचित्य साधून तालुका राजुरा, जिवती आणि कोरपना अंतर्गत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा येथे डॉ. मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात रेबीज लसीकरण शिबिराचे नियोजन केले. यावेळी मुख्यधिकारी नगरपरिषद, राजुरा यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूने सकाळी कार्यालयाच्या आवारात स्वच्छ्ता अभियान घेवून संपूर्ण परिसर स्वच्छ करून निर्जंतुकिरण केले.
या कार्यक्रमाला श्वानप्रेमिंनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना तज्ञांनी आवश्यक रेबीज रोगाबाबत माहिती दिली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पवन जोंग, उप विभागीय वनअधिकारी राजुरा, डॉ. उमेश हीरुडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी चंद्रपूर, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिराम वरठी चंद्रपुर, डॉ. समिरन सास्तुरकर , आपुलकी फाऊंडेशनच्या संस्थापिका कृतीका सोनटक्के यांनी पाळीव प्राण्याबाबत जनमानसात आपुलकी असावी याबाबत आपली मते मांडली.
यावेळी पवन जोंग यांनी वन्य प्राण्यांना होणाऱ्या रेबीज रोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. काळे यांनी रोगाच्या समूळ उच्चाटन करण्याबाबत संदेश दिला. डॉ. हिरूडकर, डॉ. सास्तुरकर, डॉ. वरठी आणि डॉ कांगटे यांनी रेबीज रोगाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुका लघु पशुविद्याकिय सर्व चिकित्सालय, राजुरा येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता धांडे यांनी श्वान प्रेमींना रेबीज रोगाचे लसीकरण नियमित विहित वेळेत करण्याबाबत आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. आकाश बालबरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ.भाग्यश्री बेलसरे यांनी केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…