उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- देशाचे रक्षण करणारे वीर सैनिक आणि आंबेडकरी चळवळ आणि तथागत गौतम बुद्धाच्या विचार तळागाळात पोहचविणारे बुद्धा चंदू ओहळ याचे 26 सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. यावेळी श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कालकथित बुद्धा चंदू ओहळ यांचा जन्म माळी नगर ता. अकलूज जि. सोलापूर येथे झाला. त्याचे सर्व शिक्षण कोल्हापूर या ठिकाणी झाले आहे.ते S.Y BA मध्ये असताना 1977 साली सैन दलात भरती झाले.त्यांना आई, वडील आणि एकूण 5 भाऊ व 2 बहिणी असा मोठा परिवार होता. कालकथित बुद्धा ओहळ यांचा विवाह 1982 साली झाला.त्यांना 1 मुलगा व 2 मुली आहेत. कालकथित बुद्धा ओहळ यांनी भारतीय सैन्य दलात एकूण 24 वर्षे देश सेवा केली.सेवा निवृत्त होण्याच्या पूर्वीच बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करीत होते.सेवा निवृत्त झाल्यानंतर परत सरकारी नोकरीसाठी विविध ठिकाणी सेवेची संधी मिळून सुद्धा ती नाकारून त्यापुढील पूर्ण जीवन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार सातत्याने करीत होते.त्यांनी गेली 25 वर्षा पासून सामाजिक व धार्मिक कार्य प्रामाणिकपणे केले.
कालकथित बुद्धा चंदू ओहळ हे सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर Graduation व post Graduation केले. त्यांनी बौद्ध धम्माच्या तत्वानुसार प्रचार व प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कवठेमहांकाळ सारख्या दुष्काळ भागात अनेक धम्म परिषदा व धम्म शिबीर घेवून प्रबोधानत्मक धार्मिक व सामाजिक कार्य करून एक चांगल्या प्रकारे आदर्श निर्माण करून दिला आहे .
बुध्द होवळ आणि श्रावस्ती विहाराचे नाते आगळे वेगळे आणि सलोख्याचे होत. त्यांनी श्रावस्ती विहारमध्ये अनेक धम्म देसणा तसेच एक दिवशीय ध्यान शिबिर घेऊन सांगली जिल्ह्यात बुद्ध धम्म प्रचार प्रसार करून धम्म वाढविणे साठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एक सच्चे भीम सैनिक होते त्यांचे आकस्मिक दिनांक 26/09/ 2024 रोजी दुःखद निधन झाले. बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे विहाराचे माजी अध्यक्ष विलास उबाळे तथा ग्यानसेन यांच्याबरोबर नेहमी धम्मदेसना आणि शिबिर घेण्यासाठी येत असत श्रावस्ती विहाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली यांच्यावतीने आज रविवार दिनांक 29/09/2024 भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांच्या बौद्ध धम्म प्रचार व प्रसारक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.
अशा सच्चा बौद्ध धम्माचा प्रचार अकस्मिक निघून गेल्यामुळे समाजामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी न भरून निघणारी आहे, विहाराचे संचालक व सदस्य आज रोजी त्यांच्या कवठेमंकाळ या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमा प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक सी.बी. चौधरी, सदस्य बोधिसत्व भिमरत्न बोरखडे मामा, तसेच बाळू शिंदे मामा हे उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…