मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे आमदारकीचे डोहाळे लागलेल्या इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी जोमात सुरु आहे. भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या महायुतीची जागा भारतीय जनता पक्षाला फिक्स समजली जात असून महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मध्ये जागे करिता रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीकरिता महाविकास आघाडी आणि महायुतींच्या बैठका सुरू झाल्या आहेत. राज्यात लोकसभेत मिळालेले यश विधानसभेतसुद्धा मिळावं आणि चांगला समन्वय राहावा यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्या ताकद असलेल्या जागांचा अभ्यास करून त्या जागांची तयारी करीत आहेत. महायुतीतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभा निवडणुकीला जागा वाटपात झालेला गोंधळ लक्षात ठेवून तिन्ही पक्ष विधानसभेला चांगले यश कसे मिळेल या दृष्टिकोनातून अधिकाधिक जागा मिळवण्याच्या तयारीत आहेत. जागा वाटपावर अद्याप कुठलाच निर्णय झालेला नसताना हिंगणघाट – समुद्रपुर – सिंदी रेल्वे विधानसभेच्या जागेवर महायुती ची जागा ही भाजपला फिक्स समजली जात असून आमदार समीर कुणावर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर महाविकास आघाडीत सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उद्धव ठाकरे मध्ये जागे करिता रस्सीखेच सुरू आहे.
या गावांनी घेतला आमदार कुणावर यांना मतदान न करण्याचा निर्णय?
हिंगणघाट – समुद्रपुर – सिंदी रेल्वे विधानसभेचे विद्यमान आमदार समिर कुणावर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मोठ्या मतधिक्याने पराभव करत दुसऱ्यांदा आमदार होण्याच्या मान राखला. पण या निवडणुकीत यांच्या विरोधात वातावरण अनुकूल असे दिसून येत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट तालुक्याच्या बाहेर गेल्याने आणि जनतेची मागणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात, नांदगाव आणि कोल्ही परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय न उभारल्याने जनता मोठ्या प्रमाणात नाराज दिसून येत आहे. त्यामुळे नांदगाव, बोरगाव, चिंचोली, येनोरा, बुरकोनी, कोल्ही, आजंती येथील नागरिकांनी आमदार समीर कुणावर यांच्या विरोधात मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अजून पण भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिंगणघाट शहरात आमदार कुणावर यांच्या होणार गेम?
मागील अनेक वर्षांपासून हिंगणघाट शहरात पाहिजे असा एकही प्रकल्प आला नाही. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती आणि नागरिकांनी शेकडो दिवस मोठे जनआंदोलन करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरासाठी मंजूर करण्यास सरकारला भाग पाडले. पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे समुद्रपुर तालुक्यातील जाम येते गेल्याने हिंगणघाट शहरातील नागरिकात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. त्यामुळे हिंगणघाटकर आमदार समीर कुणावर यांचा या विधानसभा निवडणुकीत गेम करणार काय ? हे निकाला नंतर दिसून येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत समुद्रपुर मधून भाजपा गड्डा.
काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला समुद्रपुर तालुक्यातून मोठ्या गड्डा पडला होता. परत लोकसभा निवडणुकीची पूनरवृती झाली तर आमदार समीर कुणावर यांची सीट धोक्यात येईल. तो गड्डा भरून काढण्यासाठी तर नाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे समुद्रपुर तालुक्यातील मतदारांना भेट देण्यात आले. अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कन्नड:- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाचे काल निकाल…
कराड तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कराड:- काल राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल…
मूलकला फाउंडेशनच्या मदतीने मिळाली जखमींना धीर. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. सिरोंचा…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- काल राज्यात विधानसभा निवडणुकीचे…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल…
प्रशांत जगताप मुख्यसंपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर…