पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथील नागपूर पोलिसांना झाले तरी काय? गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली आहे. त्यात आणखी एक खाकीला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली. शहरातील शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर बजाजनगर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा घालून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे अपहरण करुन त्याच्या परिवाराकडून 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, त्या व्यापाऱ्याने मित्राला फोन करुन मदत मागितली. त्यामुळे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा डाव फसला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गौरव पराळे आणि राजेश हिवराळे असे आरोपी पोलीस कर्मचारी तर आकाश ग्वालबंशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गौरव पराळे आणि राजेश हिवराळे हे दोघेही बजाजनगर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बीट मार्शल म्हणून कर्तव्यावर आहेत. वादग्रस्त अशी त्यांची ओळख आहे. बजाजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालण्या ऐवजी नागपूर शहरातील दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन ढाबे संचालक, जुगार अड्डे आणि अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करण्यात दोघेही अग्रेसर होते.
सोमवारला दुपारच्या सुमारास अजय वाघमारे या शेअर ट्रेडिंग करणाऱ्या व्यावसायिकाला लुबाडण्याचा कट गौरव पराळे आणि राजेश हिवराळे यांनी रचला. त्या कटात आकाश ग्वालबंशी व त्याच्या मित्राला सहभागी करुन घेतले. अजय वाघमारे यांच्या घरी छापा घातला. त्यानंतर त्यांना कारमध्ये कोंबले आणि एका ठिकाणी नेले. त्यानतर अजय वाघमारे यांना या तिघांनी मिळून दमदाटी करुन आणि अटक करण्याची धमकी देऊन 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर अजय वाघमारे यांनी पैसे आणण्याचा बहाणा करुन एका मित्राला फोन केला.
पोलिसांनी माझे अपहरण केले असून खंडणी मागत असल्याचे मित्रांला सांगितले. मित्र अडचणीत असल्याचे बघून त्यानी ताबळतोब हुडकेश्वर पोलीस स्टेशन गाठत घडलेली सर्व माहिती पोलिसांना सांगितली. यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेच अजय वाघमारे यांचे ‘मोबाईल लोकेशन’ घेऊन परिसरात घेराव घातला. तेथे चक्क खाकी वर्दीतील दोन पोलीस कर्मचारी व्यापाऱ्याला मारहाण करताना दिसले. त्यांनी गौरव पराळे आणि राजेश हिवराळे तसेच आकाश ग्वालबंशी यालाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर अपहरण आणि खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल होताच बजाजनगर पोलिसांनी दोन्ही कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते, अशी नोंद पोलीस स्टेशन केली आहे, हे विशेष.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…