वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे, २८:- स्त्रियांना आपलं आयुष्य मुक्तपणे जगता यायला हवं, तिच्या मर्जीशिवाय तिच्या अंगाला हात लावायचे कुणी धाडस करता कामा नये, असा समाज अस्तित्वात आला तर मला माझ्या छोट्या मुलीचीही काळजी वाटणार नाही. या भावना व्यक्त केल्या सामान्य घरातल्या एका गृहिणीने. याला निमित्त होत ‘मेरी रातें मेरी सडके’ या महिला जागर समिती आयोजित उपक्रमाची दुसऱ्या रात्रीचे शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी ‘जिजाऊ तुझ्या संस्काराने, भय इथले संपवायचे आहे’, या संकल्पनेवर ही रात्र साजरी करण्यात आली.
प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. मात्र स्त्रियांवरील वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्यातील कलाकार दबून जातो. ‘ती’च्यातील कलाकाराला बाहेर काढण्यासाठी, कलेच्या माध्यमातून तिला व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाची ही दुसरी रात्र कलेला समर्पित करण्यात आली होती. पुण्यातील
धनकवडीमधील तीन हत्ती चौकात पावसाने हजेरी लावलेली असतानाही स्त्री,पुरुष, युवक- युवती आणि लहान मुलांनी उत्साहात पोस्टरवर महिला अत्याचार, महिला सशक्तीकरण या विषयावर संदेश लिहिले, चित्र काढले. एवढंच नाही तर ते करताना त्यांच्या मनात काय भावना उमटत होत्या हेही त्यांनी यावेळी दिलखुलासपणे मांडल्या.
दिल्लीतील निर्भया प्रकरणाला यावर्षी 12 वर्ष होत आहेत. त्यानिमित्त महिला जागर समितीद्वारे ‘मेरी राते मेरी सडके’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये समितीद्वारे हा उपक्रम 21 सप्टेंबर पासून 14 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध स्त्री संघटना आणि संस्था सहभागी होत आहेत, असे अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी यावेळी सांगितले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…