भिवापूर व गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून कारवाई करा गुरुदयालसिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्याकडून मागणी.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या भिवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत हे भष्ट्राचाराचे माहेर घर झाले असून, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कडून नागरिकाची सर्रास लूट सुरू आहे. मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायत मधले कर्मचाऱ्यांचे अत्याचार गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येते खुलेआम चपरासी कोणत्याही शासकीय कामाकरिता पैशाची मागणी करत आहे. पैसे द्या तर तुमचे काम करेल असे म्हणून कुठलीही भीती नबागळता लाच घेणे सुरू आहे. घरकुल या प्रकरणात हा सगळा प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी केलेले शौचालय व विहिरीची व घरकुलाची योजना या सर्व योजनेमध्ये ५००० हजार रुपये कमिशन घेणे म्हणजे सरळ लाच घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून सुरू आहे,
संदीप खंडाळ हा ग्रामपंचायत चपरासी आहे तो खुलेआम दादागिरी करतो व मनमानी कारभार करत नागरिकांना कोणतेही ग्रामपंचायतचे काम करण्याकरिता लाज स्वरूपात पैशाची मागणी करतो आहे. सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व सचिव यांच्या सहमतीने हा प्रकार सुरू आहे. ग्रामपंचायत दहा ते पंधरा दिवस एक दिवस उघडली जाते व ज्या नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये अर्जंट काम पडले त्यांनी कुठे जायचे, कोणाकडे जायचं जर नागरिक गट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काही कार्यालय काम येऊन गेले तर तेथील चपराशी संदीप खंडाळ हा सर्व लोकांना दिवस सांगतो की ३ दिवस ४ दिवस या, नंतर घरी बोलावतो आणि पैशाची लाज स्वरूपात मागणी करतो. कार्यालयीन पदाधिकारी सचिव व अन्य लोक पंधरा दिवसातून एकदा स्व मताने येतात व जातात कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. शासन यांना घरी बसायचं पगार देत आहे का हा प्रश्न लोकांच्या समोर उभा होत आहे हे सर्व कर्मचारी आपल्या आपल्या कामात व्यस्त असून नागरिकांनी कोणाकडे जायचं हे प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
भिवापूर व गंगापूर गट ग्रामपंचायत मध्ये पाच वर्षापासून लाईट बंद आहे हे कर्मचारी संदीप खंडाळ यांनी लाईव्ह कॅमेरासमोर स्वतः सांगितले व ग्रामपंचायत येथे लाईन कापण्यात आली आहे ही परिस्थिती विजापूर गट ग्रामपंचायतची होऊन बसली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक की, ग्रामपंचायतला सर्व कागदपत्र पुस्तके व कार्यालयाचे सर्व महत्त्वाचे लेखी कार्यालयीन दस्तावेज हे सर्व कर्मचारी संदीप खंडाळ यांच्या राहते घरी सापडले. पाणीपुरवठाच्या नावाखाली घाण पाणी नागरिकांच्या घरी व नळात पोचवले जात आहे. कर्मचारी संदीप खंडाळ व राजू मोहनकर हे दोन चपरासी कार्यरत असून यांना कितीदा लोकांनी व नागरिकांनी सांगितले हे पाणी खूप गांडूळ येतात तर हे त्यांना टाळाटाळ करण्याचे उत्तर देतात की हे आमचे काम नाही प्यायचे असेल तर प्या नाहीतर नका पिऊ चार ते पाच डेंगू पेशंट या पाण्यामुळे हॉस्पिटल मध्ये आहे व बाकी नागरिकांना काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार. जर काही जिवाने झाली तर कोण जबाबदार राहणार,
आणखी एक म्हणजे घर कर ज्या लोकांकडे थकीत आहे हे त्या थकीत रक्कम ची त्यांना नोटीस देत नाही व वसुली सुद्धा करत नाही तसेच रक्कम मोठी असेल तर त्यांना सुलभ हप्ता मार्फत वसुली करण्यात यावी परंतु तेव्हा त्या नागरिकाला अर्जंट काम येते तेव्हा हा सगळा प्रकार त्यांच्या समोर येतो व त्या वेळेवर तो नागरिक असमर्थ होतो. त्याचे काम केल्या जात नाही व त्याला पूर्ण रक्कम आत्ताच जमा करा नाहीतर लाच मागण्यात येते.
ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या या अवैध कामाबद्दल हिंगणघाट तहसीलदार व गट विकास अधिकारी, आमदार हिंगणघाट तहसील सर्व पदाधिकारी यांना विनंती की याकडे सर्वांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावी व घर कर व पाणी कर या पैशाच्या कार्यालयीन व व्यवहाराची मागील पाच वर्षापासून भ्रष्टाचार सुरू आहे याची चौकशी करण्यात यावी अशा ग्राम पंचायत मधील सर्व कर्मचाऱ्यांचे पद लवकरात लवकर खारीज करण्यात यावे व या सर्व विषयाकडे शासनाने गंभीर लक्ष देऊन ही सर्व वरील नमूद प्रश्न मार्गी लावावी अन्यथा ग्रामस्थां कडून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मोबाईल रेकॉर्ड केला आहे सर्व सबूत गुरुदयाल सिंग जुनी वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्याकडे उपस्थित आहे निवेदन देताना समस्त गावकरी उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…