मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ. बगडियाचा आ. संतोष बांगर यांनी घेतला चांगलाच समाचार.

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी
हिंगोली:-
प्रसिद्ध रुग्णालयातील डॉक्टर मंडळींकडून खेड्यापाड्यातील रुग्णांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ पैसे उकळण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात परंतु मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून देखील पैसे उकळण्याचा प्रकार हिंगोली येथील माधव हॉस्पिटलमध्ये घडला.

हिंगोली जिल्ह्यातील मौजे झरा येथील जिजाबाई संभाजी तडस वय 70 वर्ष या वृद्ध महिलेस तिच्या नातेवाईकांनी तब्येत खराब झाल्याने हिंगोलीतील माधव हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते तेव्हा डॉ. बगडिया यांनी आपल्याकडे पिवळ्या कोपनची रुग्णांसाठी स्कीम असून तुम्हाला एकही रुपया लागणार नाही तुम्ही तुमच्या पेशंटला माझ्याकडेच ठेवा मी तुमचा पेशंट चांगला करून देईन असे आश्वासन दिले. मयत जिजाबाई या 3 दिवस ऍडमिट होत्या या दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांकडून तीस हजार रुपये बिल घेण्यात आले.

दिनांक 23 रोजी सकाळी सात वाजता सदर महिला पेशंट मयत झाली परंतु पैशाच्या हव्यासापोटी माणुसकी खुंटीला टांगलेल्या डॉक्टरने रुग्णांच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केली आणि माझे उर्वरित 20 हजार रुपये बिल द्या अन्यथा मी मयत पेशंटची बॉडी नेऊ देणार नाही अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्यावर मयत जिजाबाई तडस यांच्या नातेवाईकांनी आमदार संतोष बांगर यांना फोनवर घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यावर मानवतेला काळीमा फासणाऱ्या रुग्णालयाचा व डॉ. बगडियाचा आमदार बांगर यांना चांगलाच राग आला त्यांनी माधव हॉस्पिटलच्या डॉ. बगडिया यांना चांगलेच धारेवर धरत मयत रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडण्याचे लूचाट प्रकार ताबडतोब थांबवा अन्यथा तुमच्या रुग्णालयात चालू असलेल्या शासकीय स्कीम मला बंद कराव्या लागतील असा सज्जड इशारा सुद्धा दिला तसेच सदर डॉ. बगडिया हा माधव हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक वर्षापासून रुग्णांना लुबाडण्याचे प्रकार करत आहे अशी माहिती सामान्य जनतेमधून समोर आली आहे.

या सर्व प्रकाराची तक्रार शासन दरबारी करून सदर रुग्णालय व डॉ. बगडिया यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी आमदार बांगर यांनी प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगितले कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने लुचाट डॉक्टरचा समाचार घेऊन माधव हॉस्पिटल बंद करण्यात येईल असा इशारा देखील आमदार बांगर यांनी यावेळी दिला यापुढे कुठल्याही गोरगरीब रुग्णांना जर एखादा डॉक्टर अनावश्यक लुबाडत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील आमदार बांगर यांनी यावेळी केले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

5 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

5 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

6 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

7 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

7 hours ago