पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. नागपूर शहरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खासदार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे गृहनगर आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूर शहर हे महत्वपूर्ण आहे.
नागपूर शहरात विधानसभेच्या 6 जागा असून भाजपा, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वतीने जोरदार माोर्चे बांधणी सुरू केली असून भाजपा नागपुरात किती जागा लढणार? मित्रपक्षांसाठी किती जागा सोडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 पैकी एक विधानसभा मतदारसंघ दिला जाईल, अशी चर्चा सुरू होती. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात विधानसभा निवडणुक लढण्याची तयारी सुरू केल्याने भाजपच्या रंगात भंग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी भाजपच सर्व 6 विधानसभा मदारसंघातील पैकी 6 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कमळा’चे काम करण्याचे आवाहन केले.
एकिकृत शिवसेने पक्षासोबत युती असताना नागपूर शहरात भाजप 5 विधानसभा मतदार संघात निवडणूक लढत होती. दक्षिण नागपूर शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. युती आणि आघाडी तुटल्यानंतर दक्षिण नागपूरही शिवसेनेच्या हातून गेले. इथं भाजपचे मोहन मते आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत युती केल्यानंतर शिवसेनेने एका जागेची अपेक्षा केली होती.
मध्यंतरी भाजपचा आमदार नसलेला उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडला जाईल, अशी चर्चा होती. ती आता फोल ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाची मागणी केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आमदार आहेत. नागपूर शहरातील उर्वरित 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे मागण्यासाठी उत्तर आणि पश्चिम हे दोनच पर्याय भाजपच्या मित्रपक्षासाठी उपलब्ध होते. तेसुद्धा आता बंद झाले आहेत.
भाजपने 2014 च्या निवडणुकीत शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. तेव्हा युती आणि आघाडी फुटली होती. प्रत्येक पक्ष स्वबळावर लढला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या हातून उत्तर आणि पश्चिम दोन मतदारसंघ गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात फारसे अस्तित्व नाही. हे सुद्धा एक कारण सर्व 6 जागांवर दावा करण्यामागचे आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…