राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळावे, अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीतील वर्गीकरण रद्द करावे, जातनिहाय जनगणना करावी, तालुक्यात एमआयडीसी व्हावी आदी मागण्यांसाठी ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात गोंडपिपरीत हजारो नागरिक मोर्च्यात सामिल झाले. गेल्या १४ वर्षांत गोंडपिपरी तालुक्याची विकासकामे प्रलंबित राहिली आहे. विकासात गोंडपिपरी तालुका अग्रेसर व्हावा म्हणून मला विधानसभेत जाण्याची संधी द्या असे आवाहन माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले.
गोंडपिपरी येथील शिवाजी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरले असुन यावेळी ॲड. चटप यांना संधी द्यावी असे मत शेतकरी संघटना जिल्हा समन्वयक शालिकराव माऊलिकर यांनी व्यक्त केले. यावेळी स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, ज्येष्ठ नेते आनंद खर्डीवार, शेवेनिंग स्कॉलर ॲड. दीपक चटप, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रफुल आस्वले, तालुकाध्यक्ष रामकृष्ण सांगडे, कमलाकर खोब्रागडे, मनोज कोपावार, अंकुर मल्लेलवार, सत्तरसिंग डांगी, मालनताई दुर्गे, ओमाजी वाढई, सुरज भस्की आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…