प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पाणपक्षांचा मिश्र विण वसाहतीला इंग्रजीत हेरॉनरी म्हणतात मराठी याला सारंगागार म्हणतात. सर्वप्रथम 2012 साली हिंगणघाटच्या जनतेला हेरॉनरी या शब्दा चा परिचय झाला. 2012 या वर्षी हिंगणघाट येथील हेरॉनरी मधील झाडांची कटाई करण्यात आली त्यात बगळ्यांचे पिले त्यांची अंडी नष्ट झाली मरण पावली, ते प्रकरण निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाटचे प्रविण कडू यांनी उचलून धरलं आणि झाडांची कटाई करणाऱ्याला गुन्हा दाखल करून शिक्षा देण्याची मागणी केली होती.
तेव्हा हिंगणघाटकरांना सर्वप्रथम हेरॉनरी काय असते हे समजलं तत्कालीन वर्तमान पत्रात या हेरॉनरी संदर्भात अनेक बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या तेव्हा हिंगणघाटकरांना हेरॉनरी हा शब्द परिचित झाला. झाड कटाई प्रकरणांमध्ये एका गुन्हेगाराला अटक आणि शिक्षा झाली. तेव्हापासून सातत्याने त्या हेरॉनरीकडे निसर्गसाथी फाऊंडेशन लक्ष ठेवून असतो पान पक्षांची ही मिश्र विण वसाहत एक निसर्ग वारसा आहे आणि प्रत्येक हिंगणघाटचा नागरिकांनी याची जपणूक केली पाहिजे आपला निसर्ग आपण जपणार नाही तर दुसरा कोण जपेल या हेतूने निसर्गसाथी फाऊंडेशनच्या माध्यमातून या हेरॉनरीच्या घरट्यांची गणना 2022 आणि 2024 मध्ये करून घेतली. पुढील वर्षी निसर्गसाथीच्या माध्यमातून या घरट्यांची शास्त्रीय पद्धतीने गणना करायची आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असलेल्या घरट्यांबद्दलची इत्यंभूत माहिती आपल्याला होईल आणि हेरॉनरीची जपणूक आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल.
आज हिंगणघाट नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना हेरॉनरीचा अहवाल सादर करण्यात आला. यापुढे नगर परिषद कडून तेथील झाडांची कटाईसाठी परवानगी दिल्या जाणार नाही आणि निश्चितच हेरॉनरीतील झाडांची रक्षा होईल.
हेरॉनरी हा निसर्ग वारसा जपण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. प्रविण कडू निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…