अहेरी विधानसभेचे रणरागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांचा नेतृत्वात भामरागड येथे भव्य धडक मोर्चा संपन्न

*भामरागडचे तहसीलदार मोरेश्वर मेश्राम यांना विविध मागण्या घेऊन रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर व शेकडो महिला व नागरिक निवेदन देताना उपस्थित*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

अहेरी विधानसभेचे रणरागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम,हलगेकर यांच्या नेतृत्वात आज 8. ऑक्टॉबर ला सकाळी ठीक 11 वाजता मोर्चा तहसील कार्यालय भामरागड येथे शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधव व महिला उपस्थित होते. माजी जी. पं. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी नेतृत्व केले आहे.
भामरागड हा अतिमागास व आदिवासी तालुका असून कोणतेही विकास कामे अध्याप स्वतंत्र्यापासून पोहचलेले नाहीत एकीकडे भारत अमृत महोत्सव बनवत आहे तर दुसरी कडे समस्याचे डोंगर उपस्थित झालेलेआहे. या परिसरात आरोग्याची महासमस्या आहे, दवाखाना आहे, परंतु वेळेवर डॉ, उपलब्ध नाही, कधी,कधी औषधी पुरवटचा समस्या उद्धभ वत असतात.हे सर्व विविध मागण्या घेऊन अहेरी विधानसभेची रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांनी आपल्या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय, हत्याचार खपवून घेणार नाही. वेळ भासल्यास मोठा आंदोलन उभारु मी नेहमी जनतेशी पाठीशी उभा राहून आदिवासी जनतेवर अन्याय, हत्याचार होऊ देणार नाही. यावेळी माजी जि. पं. सदस्य ऋषी भाऊ पोरतेट आपल्या मनोगतात म्हटलं की, महाविकास आघाडी सरकार घेतललं निर्णय चुकीचा असून, धनगर समाज हा आदिवासी समाजात सामील करू नये.पेसा कायद्या अंतर्गत नोकर भरती करण्यात यावे. अश्या अनेक विविध मागणी घेत आज भामरागड येथे भव्य धडक आक्रोश मोर्चा घेण्यात आले आहे. या वेळी ऋतुराज हलगेकर, जहीर हकीम यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत घोषणा भाजी करण्यात आले आहे. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नानोटी साहेब यांचा पोलीस प्रशासनाला घेऊन जन आक्रोश मोर्चा शांततेत कार्यक्रम पार पाडण्यात भाग पाडले आहे.

श्रीनिवास विरगोंवार, श्रीनिवास चटारे, संतोष येमूलवार, अमोल मुक्कावार, भामरागड चे कार्यकर्ते चंदू बेजल वार, महेश मद्देलवार, दशरथ सुनतकर, अरुण रामटेके, शैलेश गेडाम, सलय्या कंबलंवार, विजय बोरकर, उमेश कोरेत, रमेश आत्राम, अजय कोरेत, प्रवीण गावडे, जयश्री सुनतकर, माजी जिल्हा परिषद सदस्या, कौशिकताई, या वेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

अहेरी विधानसभेतील राजाराम, खांदला पोलीस स्टेशन हद्दीत मतदान केंद्रावर पोलिसांचा चोक बंदोबस्तात शांततेत पार*

*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…

14 hours ago

राजुरा विधानसभा संघात पुनागुडा मतदान केंद्रावर मतदानाच्या टक्केवारीत वाढ 63 टक्के मतदान.

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

18 hours ago

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…

23 hours ago

बीड जिल्यातील परळीत ईव्हीएम मशीन फोडली, 3 बूथवर करण्यात आली तोडफोड.

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…

1 day ago

आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४

*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…

1 day ago