*मुलचेरा येथील जनसंवाद यात्रेत मंत्री आत्राम यांचा हल्लाबोल*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
मुलचेरा:महायुतीच्या माध्यमातून राज्यभरात विविध लोककल्याणकारी योजना राबविले जात आहेत.त्या योजनांचा गोरगरीब नागरिकांना मोठा फायदा होत आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली.या योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक धास्तावले आहे. त्यामुळे या योजनेचा विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप करत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
सोमवार (७ ऑक्टोबर) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुलचेरा तालुका मुख्यालयात जनसंवाद यात्रा व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी प.स.सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,अहेरीचे माजी सरपंच तथा युवा नेते रामेश्वर बाबा आत्राम, माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,कार्याध्यक्ष रियाज शेख, सुंदरनगरचे सरपंच जया मंडल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला,मुलचेरा पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार,अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,मुलचेराचे नगराध्यक्ष विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी,राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी,विष्णू रॉय,नगर पंचायतीचे माजी अध्यक्ष सुभाष आत्राम,जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,कोठारीचे उपसरपंच मनोज बंडावार,ग्रा.प.सदस्य निखिल इज्जतदार,सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मुलचेरा तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, सेवानिवृत्त शिक्षक रतन दुर्गे,ग्रा.प.बबलू शील,कैलास कोरेत,डेव्हिड बोगी,शंकर वंगावार, सत्यवान सिडाम,प्रकाश कन्नाके, रंजित स्वर्णकार,शैलेंद्र खराती आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बरेच लोक प्रचारासाठी घरातून बाहेर पडताना दिसत आहेत.काही लोकं ही योजना फसवी असल्याचे सांगत आहेत तर काही लोकं ही योजना आम्हीच आणली म्हणून प्रचार करत आहेत. मात्र,महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,हे लाडक्या बहिण कळले आहे.त्यामुळे विरोधक कितीही अपप्रचार किंव्हा श्रेय घेण्याचा काम केले तरी यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणी त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
या भागाचा विकास करायचा असेल तर मुलचेराला तालुक्याचा दर्जा मिळायला पाहिजे म्हणून १९९२ मध्ये मंत्री असताना चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती केली.त्यामुळे आज या तालुक्यातील ६८ गावांतील नागरिकांना मुलचेरातच विविध शासकीय कार्यालय उपलब्ध झाले.तालुक्याचा विकासासाठी पाहिजे ती निधी खेचुन आणली. येथील विध्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून तर महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली.आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या,येथील शेतकरी उत्तम शेती देखील करीत आहेत.तालुका निर्मिती झाल्याने विविध शासकीय कार्यालय आले आणि अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाले आहेत.यापुढे देखील तालुक्याच्या विकासासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आणि खांभिरपणे साथ देण्याचे आवाहन देखील केले.
*नागरिकांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ*
जनसंवाद यात्रेदरम्यान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदन स्वीकारले.त्यांनतर उपस्थित अधिकारी,कर्मचाऱ्यांची आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.यावेळी विविध विभागाकडून लाभार्थ्यांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आले.यावेळी तहसीलदार चेतन पाटील,गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…