मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सतीश धोबे तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यासाठी वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट विधानसभा -४६ मतदार संघातील आमदार समीर कुणावार तथा तहसीलदार समुद्रपूर यांनी शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ मंजुरीच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याचे प्रमाणपत्र 19 ऑगस्ट 2024 च्या झालेल्या तहसीलदार यांच्या समितीच्या सभेत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांना वितरीत करणाऱ्या प्रमाण पत्रावरील या योजनेचे अध्यक्ष म्हणून आमदार समीर कुणावार यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. तसेच त्यावर शासनाचा लोगो व राजमुद्रा प्रकाशित करण्यात आली आहे. सदर प्रमाण पत्रावरील प्रकाशित केलेले छायाचित्र हे कुठल्या नियमात बसते यावर आपल्या विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात यावे.
त्याचप्रमाणे हिंगणघाट येथील इमारत बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने मिळणारे किचन सेट व सुरक्षा पेटी मिळत असतात. त्या ठिकाणी सुद्धा आमदार समीर कुणावार यांनी स्वतःचे फोटो व स्वतःच्या नावाचे स्टिकर व टोकन तयार केले. व त्यावर सुद्धा त्यांचा फोटो असलेला टोकन वितरित करण्यात आले. ते सुद्धा नियमात बसत नसतानाही प्रशासनाने या संदर्भात आजच्या तारखेपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.
वरील सर्व विषय जर नियमात बसत असेल तर आमची व आमच्या पक्षाची कुठलीही हरकत नाही. परंतु महाराष्ट्र शासनाचे इमारत बांधकाम कामगार गोरगरीब व गरजू लोकांच्या उत्थाना करिता अशा योजना निर्माण केल्या. परंतु या योजनेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासनाचे आहे. पण शासन मात्र यात कुठेही दिसत नाही. स्थानिक आमदार समीर कुणावर हे आपल्या पद्धतीने प्रशासनावर दबाव टाकून योजनेचा लाभ स्वतःला मतदानात कसा होईल. याकरिता त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. करिता शासन हे जनतेचे की, सत्ताधाऱ्यांचे ? यासंदर्भात आपल्याकडून शासनाचे म्हणणे पक्षाला व जनतेला कळवावे ! असेही दिलेल्या निवेदनात विचारण्यात आले आहे. म्हणून आमची आपणास नम्र विनंती आहे. की संबंधित विषयावर आपण कोणती कारवाई करणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी अन्यथा आमची शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भात निवेदन देण्याकरीता पक्षाचे उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवढे, भास्कर मानकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…