वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. लोणीकंद येथे एका आईनेच आपल्या प्रिकराच्या मदतीने आपल्या पोटच्या मुलाचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना येथे गुरुवारी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आई आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल लालसिंग ठाकुर वय 30 वर्ष रा. लोणीकंद असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून सुमित्रा लालसिंग ठाकुर वय 55 वर्ष, रा. लोणीकंद व प्रफुल पुंडलिक ताथोड वय 35 वर्ष, रा. लोणीकंद यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिलचा भाऊ सुनील लालसिंग ठाकुर वय 32 वर्ष, रा. पेरणेफाटा याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित्रा व प्रफुल यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. या कारणावरून सुमित्रा व अनिल यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. याच रागातून अनिल याच्या डोक्यात त्याची आई सुमित्रा हिने प्रियकर प्रफुल्ल याच्या मदतीने डोक्यात दगड टाकून हत्या केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हा काहीही कामधंदा करत नसे. अनिलला खूप दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी सुमित्रा हिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात सतत भांडणे होत असत. दरम्यान अनिल हा दारु पिऊन तळेराण वस्ती जवळील खडीमशीन परिसरातील मोकळ्या जागेत पडला होता. आपल्या प्रेमात अडथळा ठरलेल्या अनिलच्या डोक्यात दोघांनी मिळून दगड घालून त्याचा हत्या केली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…