अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १३ ऑक्टो:- असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक मानला जाणारा दसरा “विजयादशमी” हा सण हजारोच्या उपस्थितीत भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
सुनिल केदार मित्रपरिवार व सावनेर कळमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांनी नगर परिषद हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या भव्य “रावण दहन” च्या अध्यक्षस्थानी क्षेत्राचे माजी आमदार तसेच राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार होते. यावेळी ज्येष्ठ वकील श्रीकांत पांडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल, माजी नगरसेवक नीलेश पटे, लक्ष्मीकांत दिवटे,तेजसींग सावजी, शफीक सैय्यद, डोमासाव सावजी, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विनोद जैन, माजी सचिव मनोज बसवार आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ५१ फूट उंचीचे भव्य रावण दहन पाहण्यासाठी हजारो लोक मैदानावर उपस्थित होते व रावण दहन व फटाक्यांची आतषबाजीचा आनंद लुटला.या कार्यक्रमाला संबोधित करताना माजी मंत्री सुनील केदार म्हणाले की या पावन नवरात्रीच्या पर्वावर आपण माँ जगदंबेच्या नव रूपाची पूजा करतो आणि घरातील माता, बहिणी, मुलींवर अन्याय, अत्याचार करतो. देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी नागरिकांना महिलांचा आदर करण्याची विनंती केली. तसेच अश्या कुक्रुत्याला वेळीच ठेचून रावणगीरी प्रवु्तीचा नायनाट करूण समाजात मातु् शक्तीचा जागर करण्याचे आव्हान याप्रसंगी करत म्हटले की सत्तेच्या मदात असलेले सत्ताधारी व विरोधक बीनबुडाचे आरोप करत बहिणंच्या मतावर डोळा ठेवत सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहेत.ज्यांनी गोरगरिब व मध्यमवर्गीय लोकांचे जिवन दुभर करत महागाईचा डोंगर चढवला, सणासुदीच्या वेळी खाद्यतेल तीस पसतीस रुपयाने तर आठ दहा रुपयाला मीळणार्या औषधी पन्नास रुपयाच्या घरात नेऊन ठेवण्याचे पाप केले आहे. भविष्यात जेव्हा कधी सावनेर विधानसभा क्षेत्राचा इतिहास लीहला तेव्हा तुम्ही उभ्या केलेल्या तु मच्या या सुनील केदार वर गद्दारीचा दाग लागल्याचे दिसुन येणार नाही तर गोरगरीबांना मदत करणारा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचणारा, त्यांच्या हक्कासाठी लढणारा म्हणून उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ डॉक्टर डॉ. भगत, मार्क साखरपेकर, साहेबराव विरखरे, राजुभाऊ देशमुख, पत्रकार दीपक कटारे, सादिक शेख, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घटे,युवा समाजसेवी अश्वीन कारोकर, चंदु कामदार, श्रीजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भव्य आतषबाजी करण्यात आली. उपस्थितांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमाचे संचालन किशोर धुंडेले यांनी केले तर आभार सावनेर कळमेश्वर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश खंगारे, घनश्याम तुर्के, शैलेश हजारी, मोहित बारसाकर, राहुल धोंगडे, मनीष विश्वकर्मा, गोलू दहीहंडे, स्वप्नील महाजन, सचिन मोहतकर, अजय महाजन मुकेश इंगोले, धनंजय वानखेडे, निखिल जमादार, मनीष रुशिया, सचिन पिंपळे, अजय पटेल, रितेश कापसे, रुपेश कमळे, दिनेश, अंतरीक्ष गुर्हरीकर, मनोज बावने आदींनी परिश्रम घेतले.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…