मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत आहे त्यांची दखल घेण्यात यावी दि १० ऑक्टोबर रोजी खालील मागण्यानं निवेदन देण्यात आले.
दिव्यांग मंत्रालयाला अध्यक्ष दिव्यांग असावा, दिव्यांगांचे मानधन व पेन्शन दिव्यांग मंत्रालय मार्फत द्यावे, दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे, शासन दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची एस आय टी मार्फत चौकशी करावी, दिव्यांगांचे 5 हजार रुपये पेन्शन मानधन द्यावे, दिव्यांग मंत्रालय मध्ये 50% दिव्यांग कर्मचारी नियुक्त करावे, दिव्यांग मंत्रालयाले जिल्हा किंवा विभागीय स्तरावर कार्यालय उपलब्द करून द्यावे वरील सर्व मागण्यांची शासनाने दखल घेऊन दिव्यांग समाजाला न्याय द्यावे असे निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, शहराध्यक्ष जगदीश देवतळे, शहर सचिव सचिन भजपुजे, तालुकाध्यक्ष सतिश गोळकार, प्रशांत उमाटे, महिला प्रतिनिधी वनिता ब्राह्मणे व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते..
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…