देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका (नागपूर) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील कान्होलीबारा सर्कल अंतर्गत येत असलेल्या आजनगाव येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील आमदार समीर मेघेंनी भुमी पुजन केलेल्या पांदन रस्त्यावर 6 फुट भगदाड पडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना आपल्या चिमुकल्यांना सोबत परिवाराला जीव मुठीत घेऊन शेतातील पिके मोठे अंतर पार करून आणावी लागत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आजनगाव येथील मुख्य पांदन रस्त्याचे भूमिपूजन काही महिने अगोदर आमदार समीर मेघे यांच्या हस्ते झाल्याचे माजी सरपंच आनंदराव जुनघरे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परंतु पांदन रस्त्याचे काम मात्र अजूनही झाले नाही. या पांदन रस्त्याच्या मध्ये एक नाला असल्याने व त्या नाल्याला नहराचे पाणी सोडत असल्याने या रस्त्यावर नाल्याच्या रुंदीचा सहा फूट उंच असा भलामोठा खड्डा पडल्याने शेतकऱ्यांना शेतात बैलबंडी किंवा इतर कोणत्याही वाहन नेता येत नसल्याने शेतकरी संतापून गेले आहेत त्यांना लांब अंतरावरून शेतातील पिके जीव मुठीत घेऊन डोक्यावर आणावी लागत आहे.
याकडे जिल्हा परिषद सदस्य यांचे तर इकडे अजिबात लक्ष नाही. आमदार मेघेंनी भुमी पुजन केले असल्याने शेतकऱ्यांना आशा होती की हा पांदन रस्ता सुरळीत होईल परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. बऱ्याच दा शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पांदन रस्त्याच्या नाल्यावर पायल्या (मोठे पाईप) टाकून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला परंतु नाल्याला नहराचे पाणी सोडले की पाण्याच्या प्रवाहाने ते पायल्या वाहून जातात व रस्ता जसाच्या तसाच होतो त्यामुळे शेतकरी पूर्णपणे वैतागून गेले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत इथली भडास काढणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगून टाकले आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…