भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली इथे भव्य धरणे आंदोलन झाले यामध्ये शेकडो नागरिक उपस्थित होते*

*आंदोलन करताना भारतीय कॅम्युनिष्ट पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ, सचिन मोतकुरवार यांचा उपस्थित कार्यक्रम पार*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

दि. 14 ऑक्टोबर 2024, सोमवार रोजी एटापल्ली पंचायत समिती परिसरात भाकपा अहेरी विधानसभा तर्फे आयोजित धरणे आंदोलनामध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या आंदोलनामुळे परिसरात कम्युनिष्ठ नाऱ्यांनी दनदनानून गेला. आंदोलनाच्या समर्थनार्थ गट्टा गावातील व्यापारी वर्गाने मार्केट बंद ठेवले.
या धरणे आंदोलनात भारतीय कम्युनिष्ठ पक्षाचे अहेरी विधानसभा प्रमुख कॉ सचिन मोतकुरवार, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कॉ. महेश कोपूलवर, जिल्हा सचिव कॉ. देवराव चवडे, माजी जिप सदस्य श्री सैनुजी गोटा, सूरज जककुलवार, जिल्हा महाग्रामसभाचे सचिव नितीन पदा, कॉ. शरीफ शेख, कॉ. शिवाजी नरोटी,कॉ सूरज आलाम, कॉ. रवी अलोने, रामदास उसेंडी, कॉ बंडू हेडो, कॉ. सावजी झोरे, कॉ सुरेश मिंज, कॉ. जुबेदा शेख, कॉ सुरेश मडावी, यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले.

आज, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी पंचायत समिती, एटापल्ली येथे एक मोठा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला. गट्टा बाजार पूर्णपणे बंद करून या निदर्शनाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. अहेरीतील जनतेला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत या निदर्शनातून आपला आवाज उठवण्यात आला यामध्ये

नागरिकांच्या मागण्यांचा पर्वत उभा झालं

निदर्शनात उपस्थित नागरिकांनी विविध मागण्यांसह सरकारच्या कठोर निंदा केले. या मागण्यांमध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची उभारणी, करारबद्ध कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करणे, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई, जमीन व वनहक्क पट्टेची वाटप करण्यात यावे, जातीनुसार जनगणना करणे आणि धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.तसेच पाणी आणि आरोग्य विषय गट्टा येथील पाणी टंचाई आणि वांगेतुरी आरोग्य उपकेंद्राची स्थिती यांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पाणी आणि आधारभूत आरोग्य सेवा मिळणे हा मूलभूत हक्क असून, त्या दिशेने कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याबद्दल नागरिक नाराज आहेत तसेच सफाई कामगार,शालेय पोषण आहार कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि इमारत बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या बदल्यात योग्य वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळावी, ही प्रमुख मागणी आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि शाळा बंद होण्याच्या घटनांमुळे शिक्षणावर परिणाम होत आहे गरीब आदिवासी जनता शिकेल कुठे शिकेलच नाही तर आपल्या हक्क अधिकार समजेल कस असा प्रश्न उपस्थित झालं.
तसेच नैनवाडी-दोडुर-रेखलमेठा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि ग्रामपंचायत गट्टा येथील भ्रष्टाचार यांनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण केला आहे. विकासाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि निधी याचा दुरुपयोग प्रशासनाकडून होत आहे यामुळे शासनाप्रती चुकीच्या संदेश नागरिकांना जात आहे म्हणून गट विकास अधिकारी यांनी झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी आली आहे.
याशिवाय, अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे देणे, वाढलेले विजेचे दर कमी करणे, सफाई कामगारांना कायमस्वरूपी करणे, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करणे, शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, दमकोंडवाही खदान प्रकल्प रद्द करणे, आदिवासीचा जल जंगल जमीनचा रक्षण झालं पाहिजे यासाठी भारतीय कम्युनिष्ठ पार्टी सातत्याने कार्य करेल अशी ग्वाही दिली, आशा प्रकारे शासनाच्या चुकीच्या धोरण्याबद्दल सरकारची निंदा करण्यात आली. यावेळी
भाकपा नेते कॉ. सचिन मोतकुरवार यांनी या निदर्शनातून नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सरकारला लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, सरकारने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे आणि विकासाचे काम पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने करावे.कॉ. महेश कोपूलवार कॉ. देवराव चवडे यांनी उपस्थित जनतेला आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले.
या आंदोलनामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
1. दमकोंडवाही खदान प्रकल्पाचा विरोध, वनहक्क पट्टे वाटप, गट्टा ग्रामपंचायत भ्रष्टाचार आणि कसनसुरi 33kv मानरेगा माती मुरूम रस्त्यांची तपासणी करावी.
2. गुळूनजुर गावातील जिल्हा परिषद शाळा सुरू करावी.
3. वांगेतुरी आरोग्य उपकेंद्राला गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडावे.
4. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन किमान ₹26,000 वेतन लागू करावे.
5. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे.
6. इमारत बांधकाम कामगारांना 90 दिवसांचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी त्वरित द्यावे.
7. अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे वाटप करावे.
8. जातनिहाय जनगणना करावी.
9. वाढलेले विजेचे दर कमी करावेत.
10. नैनवाडी, धूळेपल्ली आणि मर्दाकुई गावांत वीज पुरवठा सुरळीत करावा.
11. सफाई कामगारांना कंत्राटी पद्धतीतून बाहेर काढून कायम सेवेत सामावून घ्यावे.
12. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करावे.
13. शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा.

एटापल्ली इथे रक्तसाठा केंद्र, मनरेगा अंतर्गत माती मुरूम रस्ता गट्टा गुडूजूर, येलचील कल्लेम, गट्टा वाडवी, गोरगुट्टा धुळेपल्ली या रस्त्यांची मागणी केली गडचिरोली-एटापल्ली बस सुरू करणे आणि रिक्त पदे भरण्यासाठीही मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनाची मागणी लक्षात घेऊन शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अन्यथा भविष्यात यापेक्षा अधिक लोकांना घेऊन वेळोवेळी जनतेच्या समस्या घेऊन आंदोलन करू अशी माहिती अहेरी विधानसभा चे अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी माहिती दिली…

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

16 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

17 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago