आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. 4 विधानसभा मतदार संघात 11 लाख 28 हजार 392 मतदार जिल्ह्यात 1342 मतदान केंद्र, मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि. 16:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज (दि.15) केली असून जिल्ह्यात आचार संहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार विधानसभा मतदार संघात 1 हजार 342 मतदान केंद्र असून 11 लाख 28 हजार 392 मतदार 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
विधानसभा निवडणुका पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असून नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन व उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अनिल गावीत यावेळी उपस्थित होते.
44-आर्वी विधानसभा मतदार संघात 1 लाख 33 हजार 283 पुरूष मतदार, 1 लाख 31 हजार 229 महिला मतदार व 2 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 64 हजार 514 मतदार आहेत. 45-देवळी विधानसभा मतदार संघात 1 लाख 38 हजार 155 पुरुष व 1 लाख 35 हजार 522 महिला असे एकूण 2 लाख 73 हजार 677 मतदार आहेत. 46-हिंगणघाट विधानसभा मतदार संघात 1 लाख 51 हजार 274 पुरुष व 1 लाख 45 हजार 517 महिला असे एकूण 2 लाख 96 हजार 791 मतदार आहेत. 47-वर्धा विधानसभा मतदार संघात 1 लाख 46 हजार 886 पुरूष व 1 लाख 46 हजार 513 महिला व 11 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 93 हजार 410 मतदार आहेत. जिल्ह्यात पुरूष मतदारांची संख्या 5 लाख 69 हजार 598, महिला मतदारांची संख्या 5 लाख 58 हजार 781 व 13 तृतीयपंथी मतदार असे एकूण 11 लाख 28 हजार 392 मतदार आहेत.
इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी झाली असून जिल्ह्यात 3 हजार 46 बॅलेट युनिट, 1 हजार 704 कंट्रोल युनिट व 1 हजार 839 व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन आराखडा, संवाद आराखडा तसेच रुट प्लॅन तयार करण्यात आला असून क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक व समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकूण मतदान केंद्रापैकी 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पिण्याचे पाणी, शेड, शौचालय तसेच दिव्यांग मतदारांकरिता रॅम्प व व्हिलचेअरचा समावेश आहे. इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्राचे रॅंडमायजेशन, ईव्हीएम व्हिव्हिपॅटचे ट्रकींग, कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचार संहितेत काय करावे, काय करु नये, तक्रार देखरेख यंत्रणा, माध्यम सनियंत्रण समिती, मतदार जागृती आणि सहभाग कार्यक्रम, निवडणूक विषयक प्रशिक्षण, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन, ईव्हीएम बाबत जनजागृती, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्ती याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली.
आचार संहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाण जसे रेल्वे स्टेशन, बसस्टॅंड, रेल्वेपुल, रस्ते, शासकीय बसेस, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती यावर असलेले राजकीय पक्षाचे व जाहिरात स्वरुपाचे पोस्टर, बॅनर, होर्डिंग, झेंडे 48 तासांच्या आत काढून टाकण्याच्या सूचना निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचार संहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी फ्लाईंग स्कॉड (भरारी पथक), एफएसटी, व्हीडीओ टीम, दारु, रोकड, प्रतिबंधित औषधे यांची सखोल तपासणी, राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध, नशीले पदार्थाच्या वाहतुकी संदर्भात भरारी पथक तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 4 विधानसभा मिळून एकूण 21 नाके तयार करण्यात आले आहे. या नाक्यांवर स्थिर निगराणी पथक नेमण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी विविध मोबाईल ॲप सुरु केलेल आहेत. यात इनकोअर, सुविधाॲप, सक्षम उमेदावर ॲप, सिव्हीजील, इएसएमएस ॲपचा समावेश आहे. वरील सर्व ॲप हे मतदारांच्या सुविधेसाठी असून पारदर्शक व भितीमुक्त निवडणूक पार पाडण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात मतदार सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
येत्या विधानसभा निवडणूकीत लांबच्या मतदान केंद्राच्या वाहतुकीकरीता मतदान पथकाकरीता छोट्या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे लांबचे मतदान पथक कमी वेळात मतदारसंघात पोहोचवून मिडियाला मतदानाच्या टक्केवारीची माहिती जलद गतीने पोहोचविण्यास मदत होणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 22 ऑक्टोबर, 2024 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार), नामनिर्देशन पत्राची छाननी ३० ऑक्टोबर, २०२४ (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार), मतदानाचा दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ (बुधवार), मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२४ (शनिवार) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक २५ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार)
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…