मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका आरोपीने पत्नी बरोबर असलेल्या अनैतिक संबंधातून पतीची धारधार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे. निलेश वांढरे वय 34 वर्ष राह. त्रिमूर्ती नगर वर्धा असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून सचिन पाराशर वय 38 वर्ष रा. टिळक वार्ड हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती नगर येथे ही घटना घडली आहे.
आरोपी सचिन पाराशर आणि हत्या करण्यात आलेल्या निलेश याच्या पत्नीचे प्रेम संबंध होते. त्यामुळे पती पत्नीत नेहमी खटके उडत होते. त्यात 13 ऑक्टोबर रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी सचिन पारासर याने निलेश वांढरे यांचा घरात घुसून त्याची हत्या केली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पथके रवाना केली होती अखेर पोलिसांनी आरोपी सचिन पाराशर याला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक निलेश सुधाकर वांढरे या तरुणाचे लग्न 10 वर्षांपूर्वी अल्लीपूर येथील तरुणी बरोबर झाले होते. या दोघांत शुल्लक कारणांमुळे वाद निर्माण होत असल्याने, पत्नी ही आईकडे माहेरी जात होती. त्याच दरम्यान ती हिंगणघाट येथील आपल्या बहिणीकडे सुद्धा जात असल्याने, आरोपी सचिन पाराशर या आरोपी सोबत तिची ओळख निर्माण झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्याने दोघांचे मोबाईलच्या माध्यमातून सतत बोलणे व्हायचे. पत्नी माहेरी राहत असल्यामुळे नातेवाईकांनी पत्नीची समजूत काढली आणि ती आपल्या पती सोबत राहायला लागली होती.
दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मृतकाची पत्नी अल्लीपूर येथे माहेरी गेली होती आणि सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास घरी परतली होती. सायंकाळच्या सुमारास आरोपीने दुसऱ्या क्रमांका वरुन मृतक निलेश याचा पत्नी सोबत संपर्क साधला असता, तो फोन मृतक निलेश याने उचलला, आणि दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद उफाळून आला आणि निलेशला मारण्याची धमकी देण्यात आली. पत्नी घरी आल्यानंतर पती पत्नी व मुलं महाप्रसाद घेण्यासाठी घरा बाहेर पडल्यानंतर महाप्रसाद घेऊन घरी परतल्यानंतर लगेच आरोपी सचिन पाराशर तोंडाला रुमाल बांधून घरात शिरला आणि धारधार शस्त्राने नीलेश वर 8 वार करीत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून प्रसार झाला होता.
पोलिसांना सुत्रांकडून माहिती मिळाली की, हत्या करणारा आरोपी सचिन पाराशर हा अमरावती जिल्ह्याच्या धामोरी येथे त्याच्या मामाकडे आहे. त्यावरून आरोपी सचिन पाराशर याला मामाकडून मोठ्या शिताफीने 24 तासांच्या आत रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, साहेबसहायक पोलीस निरीक्षक राजेश जोशी, गिरीश चंदनखेडे, ऋषिकेश घंगारे, चेतन पापळे, अमोल गीते यांनी केली.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…