वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त* *निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई* *जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलिसांची तैनाती

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आले आहे. व्याहार्ड (खुर्द) येथे आंतरजिल्हा बॉर्डरवर लावण्यात आलेल्या एस.एस.टी. चेक पोस्टवर प्रतिबंधित 35 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली असून जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती वाढविण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. 18) सकाळी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, जुगार प्रतिबंध, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु तसेच इतर अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्यासाठी सावली पोलिस स्टेशन परिसरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर एक पांढरे रंगाची आयसर क्रमांक – सी.जी.- 07 सी.क्यु 4602 मधून
महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व पानमसाला या अन्नपदार्थाच्या विक्रीकरीता गडचिरोली ते चंद्रपूर अशी अवैद्यरित्या वाहतूक करणार आहे, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. एसएसटी चेक पोस्ट व्याहाड (बुज) येथे नाकाबंदी करून सदर वाहनाची तपासणी केली.
यावेळी वाहनातून लोखंडी तारेच्या बंडल खाली लपवन ठेवलेला महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला मजा 108 संगधित हुक्का, शिशा तंबाखुचे 200 ग्रूम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्रॅम वजनाचे 1800 बॉक्स एकूण किंमत 19 लक्ष 13 हजार 800 रुपये व वाहनाची किंमत 15 लक्ष रुपये असे एकूण 34 लक्ष 93 हजार 800 रुपयांचा माल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. जप्त वाहनाचे चालक 1) इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी (वय 27) रा.
भिलाई, छत्तीसगड 2) संतोप कुमार सुंदर सिंह (वय 47) रा. डिडरी, मध्यप्रदेश यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार करीत आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. भगत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार, संतोप निंभोरकर, पोलिस हवालदार चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डबारे यांनी केली आहे.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago