टोला नांदगांव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक रुजू झालेच नाही! शाळा व्यवस्थापनच्या समितीच्या मागणीला शिक्षणविभागाची केराची टोपली.
राजेन्द्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- टोला नांदगाव येथील गावकऱ्यांनी अखेर शाळेला कुलूपच ठोकले. टोला नांदगांव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक रुजू झालेच नाही! शाळा व्यवस्थापनच्या समितीच्या मागणीला शिक्षणविभागाची केराची टोपली.
गोंडपीपरी पंचायत समिती अंतर्गत, वेडगाव केंद्रात टोले नांदगाव जिल्ह्या परिषद शाळा आहे. या शाळेतिल शिक्षक संतोष उईके यांची तात्पुरती प्रतीनियुक्ती हिवरा शाळेत करण्यात आली. त्यामुळे टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेतिल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षक संतोष उईके याची हिवरा शाळेत करन्यात आलेली प्रती नियुक्ती रद्द करून टोले नांदगांव येथील शाळेत परत देण्यात यावी या संदर्भात शाळा व्यवस्थापण समितीचे पदाधिकारीसह ग्रामस्थानी गोंडपीपरीचे संवर्ग विकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी यांना तेथील शाळा व्यवस्थापण समिती सह गावकऱ्यांनी सह्यानिशी विनंती अर्ज केला दि. 23 सप्टेंबर रोज शुक्रवारला शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास 24 सप्टेंबरला शाळेला कुलूप ठोकुन शाळा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला.
शुक्रवारला शाळा भरली शिक्षक रुजू होणार याची विद्यार्थ्यांनी वाट बघितली मात्र शिक्षक रुजू झालेच नाही मात्र शाळेतील वर्ग खोलीत विषारी नाग सर्प आढळून आल्याने विद्यार्थी भयभीत झाले होते. शिक्षक रुजू न झाल्याने गावकऱ्यांनी संतप्त होऊन ठरल्यानुसार सर्व ग्रामस्थ शाळेसमोर उपस्तिथी झाले आणि शाळेला कुलूप ठोकण्यात आले.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…